Sunday, October 6, 2024
Google search engine
HomeUncategorized▫️ कॉ. शंकरराव दानव यांना श्रद्धांजली देण्यासाठी दि. 21 ला सर्वपक्षीय सभेचे...

▫️ कॉ. शंकरराव दानव यांना श्रद्धांजली देण्यासाठी दि. 21 ला सर्वपक्षीय सभेचे आयोजन

▫️ कॉ. शंकरराव दानव यांना श्रद्धांजली देण्यासाठी दि. 21 ला सर्वपक्षीय सभेचे आयोजन
▫️ श्रद्धांजली सभेला अ.भा. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांची व वणीतील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार
▫️ शेतकरी व श्रमिकांसाठी झटणाऱ्या कॉ. दानव यांचा श्रद्धांजली सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन
_________________
सुरेन्द्र इखारे वणी :-     वयाचा १५ व्या वर्षापासून वयाचा ७६ व्या वर्षापर्यंत शेवटचा घटका पर्यंत लाल झेंडा हातात घेऊन शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आंदोलन करणारा, त्यांच्यासाठी आवाज उंचावणारा श्रमिकांच्या आवाज कॉ. शंकरराव दानव अचानक काळाचा पडद्याआड गेल्याने यवतमाळ जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा चे कार्यकर्ते त्यांनी दिलेला मार्ग व उभारलेली संघटना आणि त्यांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी झटत असून त्यांचे विचार व कार्य जनतेपर्यंत नेण्यासाठी वणी येथील वसंत जिनींग सभागृहात दि. २१ फेब्रुवारी ला सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या श्रद्धांजली सभेला आवर्जून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, त्याचप्रमाणे विशेष उपस्थिती म्हणून माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. उदय नारकर, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर राहणार आहे.

या सभेला प्रामुख्याने विशेष अतिथी म्हणून वणी येथील नेतेगण ॲड. देविदासजी काळे, माजी आ.विश्वासभाऊ नांदेकर, संजयभाऊ देरकर, वसंत जीनींग चे अध्यक्ष आशिषभाऊ खुळसंगे, संजयभाऊ खाडे, जयसिंगजी गोहोकार, सुनीलभाऊ कातकडे, अजयजी धोबे, मंगलजी तेलंग, कॉ.गीत घोष, कॉ.रमेशचंद्र दहीवडे ( चंद्रपूर ), कॉ.अरुण लाटकर( नागपूर ), कॉ. यशवंत झाडे ( वर्धा ), कॉ.सुभाष पांडे ( अमरावती ), भाकप चे कॉ.अनिल घाटे, कॉ.ॲड. डी.बी.नाईक उपस्थित राहतील.

ह्या श्रद्धांजली सभेत ह्या सर्वांचे मार्गदर्शन होणार असून कॉ. शंकरराव दानव यांचे पश्चात त्यांचा श्रमिकांना न्याय देण्याचे उद्देश त्यांनी उभारलेल्या लाल झेंड्याचा संघटनेला जिवंत ठेऊनच त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालूनच पूर्ण करता येणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लाल झेंडा, त्याची ताकत व त्याची विचारसरणी समजावून घेणे अती महत्त्वाचे असल्याने कष्टकऱ्यांची विचारधारा असलेल्या कम्युनिस्ट चळवळी चा सर्व कार्यकर्त्यांनी तसेच जनतेने ह्या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन माकप,किसान सभा, सिटू, आशा व अंगणवाडी संघटनाचे कुमार मोहरमपुरी, ॲड. दिलीप परचाके, मनोज काळे, चंद्रशेखर सिडाम, देविदास मोहकर, अनिता खूनकर, कवडु चांदेकर, नंदू बोबडे, सरिता दानव, मनीषा गेडाम, गजानन ताकसांडे, सुधाकर सोनटक्के, सदाशिव आत्राम, मनीष इसाळकर, उषा मुरके, प्रीति करमनकर, निरंजन गोधळेकर, संजय वालकोंडे, शंकर गाऊत्रे, रामभाऊ जिद्देवार व अन्य कामरेड्स ने केली आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments