न्यू निवेदिता पब्लिक स्कूल येथे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले
सुरेंद्र इखारे वणी :- येथील महाराष्ट्र बँक चौकात प्रधानमंत्री जन औषधी केंद्राच्या जवळ असलेले न्यू निवेदिता पब्लिक स्कूल येथे नुकतेच स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यामध्ये सर्वप्रथम विद्येची देवता मा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,त्यानंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, या स्पर्धेमध्ये रुद्र मोहु्ले, कोमल दिकुंडवार, दुर्गेश नालंमवार, आराध्या कुत्तरमारे, आराध्या बिहारी ,आरोही भांडेकर ,आरोही हांडे ,विक्रांत दोडके ,तनिष्क नक्षीने कनिष्का गिरुडकर, अर्पित संदूरकर, भूपेश लांजेवार, उमर शेख ,कौसर शेख ,आरुषी राळे, शर्वरी मोहु्ले ,लावण्या झिलपे आभा शिरसागर ,रुचिता गोडे, या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक महिला समाजाच्या अध्यक्षा सौ शालू गंगशेट्टीवार या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कविताताई सुरावार या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका सौ. किरण कुंचमवार यांनी केले . सूत्रसंचालन सौ. सपना कुंचमवार यांनी केले तर आभार सौ.कविता मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेबीताई गटलेवार आणि सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.