वणी येथील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रशिक्षणाला डायट च्या अधिव्याख्याता डॉ किरण रापतवार यांची भेट
सुरेंद्र इखारे वणी :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल वणी येथे सुरू असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाला आज दिनांक 6 मार्च 2024 रोज बुधवारला दुपारी 12.30 वाजता यवतमाळ येथील डायट च्या अधिव्याख्याता डॉ किरण रापतवार मॅडम तसेच विषय सहायक अमित ठोकळ यांनी भेट दिली.
मान्यवरांनी दोन्ही कुला ला भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. व प्रशिक्षणाला शुभेच्छा देऊन रजा घेतली. यावेळी डायट च्या अधिव्याख्याता डॉ किरण रापतवार मॅडम तसेच विषय सहायक अमित ठोकळ, राज्य सुलभक अभय पारखी, तालुका समनव्यक विनोद नासरे, प्रितेश लखमापुरे, आनंद हूड, वैजनाथ खडसे, सुनील झाडे, गणेश लोहे, वंदना शंभरकर, प्रमुना भोयर,ज्योती बडे या प्रशिक्षकांची उपस्थिती होते या प्रशिक्षण भेटीचे सूत्रसंचालन प्रितेश लखमापुरे व वैजनाथ खडसे यांनी केले तर आभार विनोद नासरे यांनी मानले