Sunday, October 6, 2024
Google search engine
HomeUncategorizedस्त्री सामर्थ्याचा उपयोग राष्ट्र उन्नतीसाठी काळाची गरज -  ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे.

स्त्री सामर्थ्याचा उपयोग राष्ट्र उन्नतीसाठी काळाची गरज –  ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे.

स्त्री सामर्थ्याचा उपयोग राष्ट्र उन्नतीसाठी काळाची गरज –  ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे.
सुरेंद्र इखारे वणी  :-     सुखी संसाराची दोन चाके म्हणून पती पत्नी  ओळखले जाते. परस्परांच्या सहकार्यानेच दोघाचेही जीवनपट सुकर करणारे ती दोन्ही चाके सारखी असली तरच, संसाररथ व्यवस्थित चालेल. स्त्रीनं निर्भय असल पाहिजे तरच ती सक्षम पीढी घडवू शकेल. स्त्री ही अबला आहे असा आज समज झालेला आहे, त्यामुळे तिच्यावरील अन्याय, अत्याचारात वाढ झाली आहे. या प्रतिकूल परिस्थितीलां तोंड देण्यासाठी स्त्रियांचे संघटन असणे गरजेचे आहे. आज कर्तृत्ववान आणि सामर्थ्यवान अशा स्त्रियांचे, दर्शन घडत असले तरी स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वेरपणाने वागून स्त्रीत्वालां कुठेही गालबोट न लागू देता स्वातंत्र्याचा संयमाने उपयोग करून तिच्यातील सामर्थ्याचा उपयोग समाज व राष्ट्राच्या  उन्नतीसाठी करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले .   श्री गुरुदेव सेवा मंडळ विठ्ठलवाडी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुषमा खणगण, प्रमुख अतिथी  स्नेहलता चुंबले, रचना देशमुख व मार्गदर्शक  ग्रामगीता चार्य वैजनाथ खडसे उपस्थित होते.  याप्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये रांगोळी स्पर्धा. वक्तृत्व स्पर्धा, तसेच एकपात्री प्रयोग, भारुड, शेतकरी आत्महत्या ही नाटिका मंजुळा माता महिला भजन मंडळ यांनी सादर केली. रांगोळी स्पर्धेत नंदा ठाकरे, नेहा भादिकर, व वैशाली वातिले यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर वक्तृत्व स्पर्धेतआदर्श विद्यालयाच्या तरफीया शेख, आकांक्षा धोबे व विदिशा खोब्रागडे यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला . बाबापुर येथील महादेव खुटेमाटे विजय आसुटकर यांनी हरिपाठ सादर केला. सूत्रसंचालन
शारदा बलकी हिने केले  प्रास्ताविक विजया दहेकर तर आभार बेबी दानव यांनी मानले. राष्ट्र वंदना व सामुदायिक प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी मारोती ठेंगणे जिल्हा प्रचारक. ज्ञानेश्र्वर कडूकरत, राजेंद्र कोरडे, दिलीप डाखरे, प्रमोद राजूरकर. अरविंद दुर्गे, दत्ता देऊळकर, आर्यन रासेकर, लक्ष्मण जुमनाके, देविदास शेटे, गजानन देवगडे, प्रकाश कुचनकर, बबन जेऊरकर रज्जू पारखी प्रतिभा फाले यांनी सहकार्य केले

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments