विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे ” जिल्हा अधिवेशन”
यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ; जिल्हा कार्यकारिणीने केले आहे
सुरेन्द्र इखारे वणी :- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ मुबई, यवतमाळ येथे 17 मार्च 2024 रोज रविवारला सकाळी 11.00वाजता बचत भवन सेंट्रल सेलिब्रेशन हॉल ,जुन्या सरकारी दवाखाण्या जवळ ,मेडिकल चौक यवतमाळ येथे “यवतमाळ जिल्हा अधिवेशन ” आयोजित केले आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही संघटना माध्यमिक शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सातत्याने व समर्थपणे लढणारी व शिक्षकांच्या समस्या तडीस लावणारी एकमेव व जुनी संघटना आहे. या संघटनेला अभ्यासू निस्पृह व कुशल नेतृत्व असल्याने ही संघटना सतत कार्यरत आहे. तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी व संघटनेचा एक पाईक या नात्याने आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या जिल्हा अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार व्ही यु डायगव्हाणे, उदघाटक शिक्षक आमदार सुधाकर अडबाले,प्रमुख उपस्थिती पदवीधर आमदार धीरज लिंगाडे, प्रांतध्यक्ष अरवीं देशमुख , माजी प्रांतध्यक्ष श्रावण बरडे, विभागीय कार्यवाह एम डी धनरे, उपाध्यक्ष जयदीप सोनखसकर, उपाध्यक्ष विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे,विशेष उपस्थिती राज्यध्यक्ष संतोष राऊत, विकास टोने, रमेश जोल्हे, प्रकाश भूमकाळे, नदीम पटेल, सत्कारमूर्ती व्ही बी टोंगे, विनोद संगीतराव, दादाराव कदम, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक साईनाथ चांदापुरे, संदीप कोल्हे, दीपक पडोळे, सुजित ठाकरे, उपस्थित राहणार आहे.
या अधिवेशनात माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अनेक विषयांवर चर्चा होऊन त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न शासन दरबारी करण्यात येणार आहे तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील सर्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या सदस्य व पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अश्फाक खान, कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे, विजय खरोडे, मनोज जीरापुरे, पवन बन, गणेश धर्माले, एस बी धात्रक, मंगला वडतकर, उमेद डोंगरे, एस एस वडते, संजय पुरी, आनंद मेश्राम, संजय देवळकर, गंगाधर गेडाम, कविता कोरचे, श्रीकांत अंदूरकर, महेश अंदूरे, संतोष हेडवू, अरुण गारघाटे, सुरेश बरडे, गजेंद्र काकडे, सुरेन्द्र शिंदे, छाया कोरडे, गजानन इंगोले, पी एन गुंडेवाड, दिवाकर नरुले, रेखा सुरकर, शेख जुलेखा शेख रशीद, प्रमोद दुधे, एम व्ही जाधव, एस एन मरापे, गौतम वासनिक , गोविंदराव ठावरी किशोर बोढे व दत्ता महाकुलकार यांनी केले आहे.