कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थ्यांची ऐतिहासिक स्थळांना भेट
दिल्ली, आग्रा, मथुरा,वृंदावन या स्थळांचे महत्व विद्यार्थ्यांनी जाणले
सुरेंद्र इखारे वणी :- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील इतिहास व वाणिज्य विभागाने दिल्ली, आग्रा मथुरा व वृंदावन या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन त्याचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे या दृष्टीकोनातून शैक्षणिक सहल काढण्यात आली .इतिहास हा विषय भूतकाळात घडणाऱ्या घटनांची माहिती ही मानवाला शहाण बनवणारी विद्याशाखा आहे. इतिहासामध्ये स्थळ भेटीला विशेष महत्त्व असते. म्हणूनच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करणे अपेक्षीत मानले जाते. त्यानुसार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगावच्या इतिहास विभागाने पाच दिवसांची शैक्षणिक सहल काढून दिल्ली, मथुरा, वृंदावन व आग्रा येथील ऐतिहासिक स्थळांना विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घडून आणली. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला, कुतुब मिनार परिसर, इंडिया गेट, शहीद स्मारक, राष्ट्रपती भवन या स्थळांना प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीमध्ये डॉक्टर गजानन सोडणर यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक वास्तूचे महत्त्व सांगतानाच त्या वास्तू मागचा इतिहास व त्या वास्तु मध्ये असलेले कलाकृती, पाणी व्यवस्थापन, प्रशासकीय दृष्टिकोनातून असलेले महत्त्व या सर्व बाबी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे समजावून सांगितल्या. मोगलांच्या स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला आग्र्याच्या किल्ल्याला विद्यार्थ्यांनी भेट दिली. मोगल साम्राज्यातील सर्वात सुंदर वास्तू म्हणजे आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये असलेला दिवाण -ए- खास हि वास्तू, वास्तुकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला गेला आहे. येथे मोगलांचे उच्च प्रतीचे मंत्री बसून राज्यकारभार करीत असत. ही वास्तू पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये बनवण्यात आलेली आहे. दिवान -ए- खास च्या सौंदर्या बाबत बोलताना असे म्हणतात जर या पृथ्वीवर स्वर्ग कोठे असेल तर तो येथे आहे ,येथे आहे ,येथे आहे, आणि याच दिवाने खास मध्ये डॉक्टर गजानन सोडणार यांनी मोगल साम्राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. आग्रा येथे ताजमहालाच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी ताजमहालाचे पूर्णपणे निरीक्षण केले तेथील मीनारींवर अलंकृत करण्यात आलेली कमळ पुष्पे , येथे अस्तित्वात असलेले सुंदर बाग बगीचे याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. मथुरा वृंदावन मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थळ, द्वारकाधीश मंदिर, प्रेम मंदिर अशा अनेक स्थळांना भेटी दिल्या या ठिकाणी श्रीकृष्णाने केलेल्या लिलांची सुंदर शिल्पे साकारण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी यमुना नदीमध्ये नौका विहाराचा आनंद घेतला. शालेय शैक्षणिक सहल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश घरडे सरांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. व संपूर्ण प्रवासामध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सहलीमध्ये महाविद्यालयातील एकूण 47 विद्यार्थी सहभाग घेतला होता. सहलीमध्ये वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. माधुरी तानुरकर, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. संतोष गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका होती तसेच ते प्रत्यक्ष सहलीमध्ये सहभागी होते. या सहलीचे मुख्य नियोजन हे प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी केले. प्रा. विजय भगत, प्रा. स्नेहल भांदककर मॅडम, डॉ. वर्षा गणगणे मॅडम यांनी सहलीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन मोलाचे सहकार्य केले. तसेच महाविद्यालयातील मित्रपरिवार यांचे सहलीच्या नियोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले.