25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

पुरोगामी पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी जयंत साठे यांची निवड

पुरोगामी पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी जयंत साठे यांची निवड

नागपूर प्रतिनिधी  -:    पुरोगामी पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी जयंत साठे यांची नुकतीच निवड करण्यात आली. जयंत साठे हे मागील 25 वर्षापासून वृत्तपत्र सृष्टी काम करीत आहे. त्यांनी देशोन्नती, सामना, लोकमत, भास्कर, नवराष्ट्र आदी वृत्तपत्रात काम केले आहे. केलेल्या उल्लेखनीय पत्रकारितेबद्दल त्यांना श्रद्धेय जवाहरलाल दर्डा शोध पत्रकारिता पुरस्कार व अरविंदबाबू देशमुख शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते सध्या दैनिक अजिंठा टाइम्स या दैनिकात नागपूर जिल्हा प्रतिनिधी व वणी 24 न्यूज पोर्टलमध्ये उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांच्या सूचने नुसार प्रदेश अध्यक्ष संतोष जाधव,राज्य सचिव निलेश ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.या सबंधी संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांना नियुक्तीची प्रतिलिपी पाठविण्यात आली असून,जयंत साठे यांच्या निवडीबद्दल पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारणी,विदर्भ कार्यकारणी,विविध जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष,पुरोगामी साहित्य संसद च्या विदर्भ अध्यक्षा ऍड.योगिता रायपूरे, रणजीत सिंह चंदेल, नाना मुंदे, संजय भगत, रमेश तांबे, छोटू राऊत, संजय तेलंग, बंडू कांबळे, दिगंबर पुनवटकर, प्रलय तेलतुंबडे, नरेंद्र वैरागडे, राजेंद्र बागडे, गौतम तोतडे, कवडूजी नगराळे, विनोद आदे, कास्ट्राईबचे प्रदेशाध्यक्ष अरुण गाडे, राजेश कांबळे, विवेक तेलंग, सुभाष आडे, घनश्याम पाटील, श्रीकृष्ण सोनारखन, रमेश तेलंग, नरेश तेलंग, प्रमोद करमणकर, मोहन भवरे, रूप कुमार तेलंग, सतिश राणा, प्रा. माधवराव सरकुंडे, मिलिंद किर्ती यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News