लोकमान्य टिळक महाविद्यालयात विजय मुकेवारांची मुलाखत आणि एलईडी बल्ब कार्यशाळा
सुरेंद्र इखारे वणी :- विद्यार्थ्यांमध्ये विविध कला कौशल्यांची रुजवन करण्याच्या भूमिकेतून शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या इंग्रजी आणि भौतिकशास्त्र विभागात द्वारे मुलाखत मान्यवरांची आणि एलईडी बल्ब निर्मिती कार्यशाळा असे दोन उपक्रम संयुक्तरीत्या आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सहसचिव अशोक सोनटक्के संचालक उमापती कुचनकार, अनिल जयस्वाल, नरेश मुनोत, नरेंद्र ठाकरे,प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.अभिजित अणे तथा भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ .गजानन अघळते हे मान्यवर उपस्थित होते.
इंग्रजी विभागाद्वारे आयोजित केलेल्या मान्यवरांची मुलाखत या उपक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ .अभिजित अणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या या कौशल्याचे सविस्तर वर्णन करीत विद्यार्थ्यांच्या साठी ही नवीन संधी आहे हे अधोरेखित केले.
भौतिकशास्त्र विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एलईडी बल्ब निर्मिती कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद घेता आला हे सांगत रोजगाराभिमुख शिक्षणाची भूमिका डॉ. गजानन अघळते यांनी स्पष्ट केली.
आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ .प्रसाद खानझोडे यांनी दोन्ही विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचे कौतुक करीत भविष्यात बायोडाटा सादर करताना आपल्याला असे अनुभव इतरांपेक्षा समृद्ध करतील हे विशेषत्वाने प्रतिपादन केले.
मान्यवरांची मुलाखत या सदरात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, वणीचे माजी नगराध्यक्ष विजय मुकेवार यांना शिफा सिद्धीकी, गौरव रामटेके, स्नेहा चौरसिया, साक्षी बोथरा ,राहुल दुपारे, कुमकुम झाडे, सिमरन डोहे, नूरसरिया खान, रितू बतखल, शुभम खोब्रागडे, कामाक्षी अंबुलकर,तुबा खान आणि धम्मरूचा दरुंडे या विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांचे शिक्षण, कार्य, अनुभव, योजना आणि संदेश अशा विविध विषयांवर प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची विजय मुकेवार यांनी दिलखुलासपणे सविस्तर उत्तरे देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
भौतिक शास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरात तयार करण्यात आलेल्या एलईडी बल्ब च्या निर्मितीची प्रक्रिया प्रात्यक्षिक स्वरूपात सादर करून तयार केलेल्या बल्बची विक्री देखील करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल कोसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रविण गोसावी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलेश जिट्टावार, डॉ आदित्य शेंडे ,अंजली अत्राम, मनोज सरमुकद्दम, दिनकर उरकुंडे, अनिल चामाटे, पंकज सोनटक्के, नितेश चामाटे, कार्तिक देशपांडे , बधुसिंग वडते आणि संजय बिलोरिया यांनी विशेष परिश्रम घेतले.