23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

आजवरची कलोपासना सार्थकी लागली याचे समाधान -प्रा डॉ दिलीप अलोने 

 

आजवरची कलोपासना सार्थकी लागली याचे समाधान -प्रा डॉ दिलीप अलोने 

भगवान महावीर जयंतीनिमित्ताने उमरी पठार येथील वृद्धाश्रमात कलेतून साधला संवाद

सुरेंद्र इखारे वणी  :-   उडवलेल्या परिस्थितीमुळे वृद्धाश्रमाचा आधार घेऊन जीवन जगणाऱ्या दुःखितांच्या ओठावर नकलांच्या माध्यमातून हसू याचा उमटवता आले याचा आनंदच वेगळा आहे आजवरची कलोपासना सार्थकी लागली याचे समाधान आहे असे मत लोक कलावंत नकलाकार डॉक्टर दिलीप अलोने यांनी व्यक्त केले
भगवान महावीर जयंती निमित्त उमरी पठार येथील संत सेवालाल दोला महाराज वृद्धाश्रमात नकलांच्या सादरीकरणानंतर ते व्यक्त होत होते यावेळी वृद्धाश्रमाचे संचालक शेषराव डोंगरे सह्याद्री दूरदर्शनचे आनंद कसंबे नकलाकार राम झिले उपस्थित होते
वृद्धाश्रमातील वृद्धांशी संवाद साधल्यानंतर नकलाकार दिलीप अलोने आणि राम झिले यांनी विविध नकला सादर करून उपस्थित त्यांना पोट धरून हसायला लावले
वृद्धाश्रमात समाधानी जीवन जगत असले तरी मनाचा एक कंगोरा वेदनेने कुडत असतो या वेदनेवर क्षणभर का होईना आपल्याला फुंकर घालता आली याचे मनोमन समाधान वाटते असे मत डॉक्टर अलोने यांनी व्यक्त केले शेषराव डोंगरे यांनी कलावंतांचे स्वागत करून आभार मानले कलावंतांनी कलेच्या माध्यमातून लोकरंजनचे कार्य करीत रहावे असे मत आनंद कसंबे यांनी व्यक्त केले

 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News