23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणीत नाट्य व नृत्या द्वारे महाराष्ट्र दिन साजरा… 

वणीत नाट्य व नृत्या द्वारे महाराष्ट्र दिन  साजरा… 

सुरेंद्र इखारे वणी :-   महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे 1960 ला झाली आणि या महाराष्ट्र राज्याच्या पवित्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि आम्ही मराठी माणसं मराठी अस्मितेला जपण्यासाठी महाराष्ट्र दिन सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून नाट्य व नृत्या द्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.

सागर झेप बहुद्देशीय संस्था तर्फे जैताई मंदिरात नाट्य व नृत्याद्वारे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार   , माझी नगर सेवक राजू तुरानकर, पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रसिद्ध वारली चित्रकार शेखर वांढरे, नाट्य कलावंत अशोक सोनटक्के उपस्थित होते. सागर मुने दिग्दर्शित “पुस्तकाच्या पानातून” हे बाल नाट्य सादर केले तसेच प्रियंका कोटणाके यांनी मराठी अस्मितेला जपणारे, राज्यातील निवडक गीतांवर व महाराष्ट्र गीतावर उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शित करून सर्व उपस्थित रसिकांचे मन जिंकले. या मध्ये 6 ते 15 वयोगटातील एकूण 33 मुला मुलींनी नृत्य सादर केले होते. कार्यक्रमाला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, गरिबांसाठी सतत मदतीला धावणारे, भाजपचे प्रदेश सदस्य व धडाडीचे कार्यकर्ते विजय चोरडिया, मुन्ना महाराज यांच्या हस्ते कलावंतांना सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैताई देवस्थान चे सहकार्य लाभले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News