वणीच्या बॅडमिंटन खेळाडूंनी गाजविले सीबीएसई बोर्ड परीक्षेचे मैदान
सुरेंद्र इखारे वणीः- येथील पवन ढवस बॅडमिंटन ॲकडमी मध्ये बॅडमिंटन खेळाचा नियमित सराव करणाऱ्या जवळपास १० खेळाडूंनी वर्ग १० वीच्या CBSE बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून वणी शहराच्या क्रीडा क्षेत्रात बॅडमिंटन या खेळाचा नावलौकीक केला.
खेळ म्हटल की त्याच्याकडे पाहण्याची पालकाची मानसिकता जरा वेगळीच असते. माझा पाल्य रोज खेळाला गेला की त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल हा पालकांचा गैरसमज या गुणवंत विद्यार्थ्यांनी मात्र दुर केला. जिल्हास्तरीय, विभागस्तरीय,राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावरआपल्या बॅटमिंटन खेळाचे कसब दाखवून अभ्यासातही त्यांनी सातत्य ठेवले. त्याचेच फळ त्यांच्या वाट्याला आले. शिक्षण म्हणजे केवळ बौद्धिक विकास नसून भावनिक व शारिरीक विकास होणे अपेक्षित आहे . याचीच प्रचिती या खेळाडूंनी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून करुन दिली .
या परीक्षेत मंथन उत्तरवार याला 95% ,श्रुष्टि आबाड 90%, सौम्या मुथा 87%, प्राची गोरलेवार 85%, विरोचन गोडे 77%, चंद्रिका खानझोडे 91.4%, सिद्धी कुरकुटे 83%, नितीशा बनवट 75% आणि नितीश बनवट याला 73% गुण प्राप्त झालेत.
या सर्व मुलांच्या पाठीशी त्यांचे पालक खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या मुलांना अभ्यासाबरोबर खेळण्यासाठी पण नेहमी प्रोत्साहित केले त्यामुळेच हे सर्व मुलं खेळ व अभ्यास यात प्राविण्य प्राप्त करू शकले.
आजच्या या स्पर्धेच्या युगात लाखो रुपये खर्च करून, मोठ्या शहरात नामांकित शिकवणी वर्ग लावून सुध्दा क्रीडा व शैक्षणिक या दोन्ही क्षेत्रात प्रविण्य प्राप्त करणे सोपं नाही, त्यामुळे या सर्व विद्यार्थीनीं संपूर्ण तालुक्यासाठी हे एक उत्तम उदाहरणं दिले असून यांच्यापासून प्रेरणा आहे, या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत असून नियमित खेळाच्या मैदानावर उपस्थित असलेल्या गुरुजनांचा सन्मान आहे.