23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणीच्या जैताई मंदिरात उत्साहात साजरा झाला मातृदिन

वणीच्या जैताई मंदिरात उत्साहात साजरा झाला मातृदिन

सागर झेप या बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार

सुरेंद्र इखारे वणी :-   आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नुकतेच मातृ दिवस उत्साहात  साजरा करण्यात आला.

सांस्कृतिक क्षेत्रात सागर झेप बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने वणीचे आराध्य दैवत जैताई मंदिर येथे मातृदिनानिमित्त स्त्रियांकरिता फॅन्सी ड्रेस, नृत्य व इतर खेळ घेण्यात आले. यात महिलांनी उखाणे स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सर्व महिलांनी दर्जेदार उखाणे घेतले. काही महिलांनी व मुलींनी नृत्य सादर केले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये महिलांनी विविध संगीतावर सादरीकरण केले यानंतर त्याना बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये      पैठणी विजेती प्रथम क्रमांक श्रद्धा नक्षिने, द्वितीय क्रमांक प्रविना कामडे, तृतीय क्रमांक सोनाली समर्थ,तसेच प्रोत्साहन  बक्षीस  पल्लवी बासमवार, प्रिया कोणप्रतीवार यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन स्पृहा कोरडे, भाविका श्रीवास्तव, तपस्या बरडे यांनी केले. तर मातृ दिन साजरा करण्याची संकल्पना सागर मुने, प्रियंका कोटनाके यांची होती. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी  सुमन डेकोरेशन चे संचालक संदीप आस्वले व जैताई देवस्थानचे सदस्य व पदाधिकारी याचे सहकार्य लाभले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News