वणीच्या महसूल भवनात मुख्याध्यापक व प्राचार्य यांची तात्काळ बैठक
सुरेंद्र इखारे वणी :- येथील महसुल भवन तहसील कार्यालयात आज दिनांक 17 मे 2024 रोज शुक्रवारला दुपारी 4.00 वाजता वणी तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील वर्ग 9 ,10, 11 व 12 वि च्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कागदपत्रांबबत मुख्याध्यापक व प्राचार्य यांची तात्काळ गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वणी यांचेमार्फत सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वणी येथील तहसील कार्यालयातील महसूल भवन येथे तहसीलदार निखिल धुळधळ, नायब तहसीलदार विवेक पांडे यांचे उपस्थितीत तालुक्यातील मुख्याध्यापक व प्राचार्य याना वर्ग 9,10,11 व 12 वि तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कागदपत्रांबबत मार्गदर्शन केले. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात व शहरी भागात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते ते उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, एस सी ,एस टी साठी सेंट्रल कास्ट प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पात्रतेसाठी प्रमाणपत्र ,इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते त्यावेळी त्यांना वेळेवर उपलब्ध व्हावे यासाठी शालेयस्तरावर शिबीर घेऊन त्यांना देण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्याशी विचारविनिमय करण्यात आले . या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा वेळ व जाण्यायेण्याच्या खर्चाची बचत होईल परंतु महत्वपुर्ण कागदपत्रांच्या जुळवाजुळविसाठी शहरात यावेच लागेल त्यामुळे शासनानेच विद्यार्थ्यांना कमी कागदपत्राच्या माध्यमातून वरील प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे असे चर्चेत बोलल्या गेले. यासभेत व्हाट्सएपचा ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची माहिती टाकण्यात आली आहे. यामध्यमातून वरील माहिती विद्यार्थ्यांनपर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे. यावेळी वणी तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयाचे ,मुख्याध्यापक ,प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.