23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणीत भीषण पाणी टंचाईची समस्या 

वणीत भीषण पाणी टंचाईची समस्या 

संजय खाडे यांचे नेतृत्वात दिले  मुख्याधिका-यांना निवेदन

 प्रशासनाचे दुर्लक्ष ; वणीकर नागरिक त्रस्त

वणीकरांनी दिला एका आठवड्याचा अल्टिमेटम ; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल  

सुरेंद्र इखारे वणी-     वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात काँग्रेसचे संजय खाडे यांनी दंड थोपटले असून त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नगरपालिका गाठली व मुख्याधिकारी यांच्याशी पाणी प्रश्नावर चर्चा केली. एका आठवड्यात शहरातील पाणी समस्या सुटली नाही तर नगरपालिकेसमोर मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

गेल्या अनेक महिन्यांपासून वणीत अपुरा पाणी पुरवठा होत आहे. आधी उन्हाळा नसल्याने याचा सर्वसामान्यांना जास्त फटका बसत नव्हता. मात्र आता भर उन्हाळ्यात गेल्या महिन्यांपासून एक एक आठवडा नळ येत नाही. तर काही भागात गेल्या 15 दिवसांपासून नळ आलेले नाही. यामुळे सर्वसामान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. पाणी येत नसल्याने अनेक लोकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटकाही वणीकरांना बसत आहे.

[पालिकेला एक आठवड्याचा अल्टिमेटम
संपूर्ण उन्हाळा वणीकर अपु-या पाण्याने काढत आहे. अनेकदा मध्यरात्री नळ सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण रात्र नळाची वाट पाहत काढावी लागते. अनेकदा संपूर्ण रात्र जागूनही नळ येत नाही. यामुळे वणीकर चांगलेच हैराण झाले आहेत. येत्या एक आठवड्यात वणीकरांची पाणी समस्या सोडवावी. अन्यथा वणीकरांना सोबत घेऊन नगर पालिकेसमोर मोठे आंदोलन छेडले जाईल.असा इशारा  संजय खाडे यांनी दिला]

यावेळी राजाभाऊ पाथ्रडकर, साधना गोहोकर, शारदा ठाकरे, अशोक चिकटे, प्रेमनाथ नैताम, पीएस उपरे, प्रमोद लोणारे, पलाश बोढे, क्रिष्णा पचारे, सुरेश बनसोड, लता भोंडाळे, मिनाक्षी रासेकर, पद्मा ताजणे, सारिका बोबडे, संगिता खाडे, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, ललिता बरशेट्टीवार, मंगला झिलपे, सविता रासेकर, अशोक पांडे, कैलास पचारे यांची उपस्थिती होती.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News