25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

अभिनव भाषा अध्ययन साधन- पंचभाषी विद्यार्थी व्याख्या(न) कोश

अभिनव भाषा अध्ययन साधन-
पंचभाषी विद्यार्थी व्याख्या(न) कोश

अनमोल आणि संग्राह्य ग्रंथ घ्यावा असे आवाहन 

एक शब्द पाच भाषेत खरोखरच शब्दांचे रसग्रहण करण्याची सुवर्ण संधी

सुरेंद्र इखारे वणी     :-         काव्यशास्त्रविनोदेन
कालो गच्छति धीमताम् !
अर्थात बुद्धिमान लोकांचा वेळ काव्य,शास्त्र आणि विनोदाच्या माध्यमातून सत्कारणी लागत असतो. काव्य आणि शास्त्राचा आधार आहेत शब्द. भारतीय संस्कृतीने शब्दांना इतके महत्त्व दिले आहे की परब्रह्म , नादब्रह्मानंतर या शब्दांनाच शब्दब्रह्म असे म्हटले आहे.
शब्दांचा आस्वाद ,त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया, त्यांच्यातील अर्थछटा, या माध्यमातून प्रकट होणाऱ्या वेगवेगळ्या भावना या सगळ्यांचा अभ्यास हा खरोखरच अवर्णनीय विषय.
शब्दांचे हे परम व्यापक विश्व नेमकेपणाने कळले नाही तर काहीशा वेगळ्या संदर्भात, शब्दजालं महारण्यं चित्तविभ्रमकारकम् ! अर्थात शब्द हे महान अरण्याप्रमाणे अथांग, अपार, गहन आहेत. ते चित्ताला भ्रमित करू शकतात असे थेट भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात.
शब्दाच्या नेमक्या अर्थाच्या निरूपणासाठी निरूक्ता सारखे महान शास्त्र भारतात निर्माण झाले. आजवर असंख्य लोकांनी वेगवेगळ्या दृष्टीने या शब्दरत्नाकरचा संग्रह आणि रसास्वाद करण्याचा विविध दृष्टीने प्रयत्न केला आहे. या प्रयत्नातील अगदी अलीकडच्या काळातील आणि खरोखरच विस्मयीचकीत करणारा प्रयत्न म्हणजे संतनगरी शेगांव निवासी चंद्रशेखर पंडित आणि सौ. ललिता पंडित यांनी साकारलेला पंचभाषी विद्यार्थी व्याख्या(न)कोश.
कोणताही एक शब्द घेतला की त्याचे संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू अशा पाच भाषेतील प्रतिशब्द देत ते शब्द नेमके कसे निर्माण झाले? त्याचे चिंतन करीत, त्यांच्या वेगवेगळ्या अर्थछटांना अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तरीही मनोरंजक शैलीत आपल्यासमोर ठेवणारा हा प्रयत्न खरोखरच अतुलनीय आहे.
६१ व्या अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनात शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांकडून प्राप्त झालेला उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार उपक्रमाच्या वैभवाला अधोरेखित करण्यास पुरेसा आहे.
उज्वलम् , उजळणी, रिविजन, दोहराना, मश्क अशा स्वरूपात जवळजवळ प्रत्येक शब्दासाठी पाचही भाषेतील प्रतिशब्द आणि त्यांचा उद्गम तथा त्यामागील विविधांगी चिंतन अशा स्वरूपात या कोशात आपल्याला तब्बल १०००० च्या वर शब्दांचे रसग्रहण करण्याची सुंदरतम संधी उपलब्ध झाली आहे.
निराली प्रकाशनाच्या द्वारे प्रकाशित झालेल्या डबल क्राऊन आकारातील तब्बल ४८१ पृष्ठांच्या या ग्रंथाची मूळ किंमत ६०० रूपये असली तरी प्रचार प्रसाराच्या भूमिकेतून श्री चंद्रशेखर पंडित ( +91 78751 74002 ) यांना थेट संपर्क केल्यास ते पोस्टेज खर्चासह केवळ कमी रुपयात हा ग्रंथ आपल्याला पाठवू शकतील.
या अनमोल आणि संग्राह्य ग्रंथाविषयीच्या या विषयी सवलतीचा लाभ सर्व भाषा प्रेमी जणांनी, विद्यालय महाविद्यालयांच्या आणि सार्वजनिक ग्रंथालयांनी देखील घ्यावा असे  आवाहन स्वानंद गजानन पुंड वणी यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News