23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

शिरपूर येथील विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थांना फटका

शिरपूर येथील विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थांना फटका

उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन 

शिरपूर येथील कार्यालयात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा 

सुरेंद्र इखारे वणी :- वणी तालुक्यातील शिरपूर कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावातील घरगुती व कृषिपंप विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबतचे निवेदन माजी जिल्हापरिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकारी राजस्व विभाग वणी ,मा. श्री एकरे साहेब उपविभागीय अभियंता म रा वी वि कं मर्यादित वणी यांना देण्यात आले.

वणी तालुक्यातील शिरपूर अंतर्गत येणाऱ्या पुनवट, नायगाव, सावंगी, बेलोर, पुरड, शेलु, चिंचोली, शिवणी, शिरपूर, खांदला, चारगाव, वारगाव, बोरगाव, आबइ ,कुर्ली, व परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मध्यंतरी होणाऱ्या वादळ वाऱ्यांमुळे विद्युत पुरवठा खंडित झाला यामुळे शेतकरी, शेतमजूर, लहान मुले, वयोवृद्ध, याना मे महिन्यात असलेल्या तापमानाचा फटका बसत असून त्यांना उपलब्ध असलेल्या विद्युत उपकरणाचा लाभ घेता येत नाही. गावागावात विजेवर अवलंबून असणारे छोटे व्यावसायिक याना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच शेतावरून येणाऱ्या शेतकरी  शेतमजुरांना विद्युतच्या लपंडावामुळे स्त्रियांना अंधारात रात्र काढावी लागत आहे या विद्युत विभागाच्या बेजबाबदार पणामुळे ग्रामीण जीवन अस्वस्थ झाले आहे.  वादळ वाऱ्यात वाकलेले पोल थातुरमातुर दुरुस्ती करून जैसे थे परिस्थिती निर्माण करत आहे. तसेच आर डी एस एस योजने अंतर्गत मंजूर असून ती सुरू केल्या जात नाही, मेन्टन्सच्या नावावर दरवर्षी गावातील कृषी पंप , डी प्या उघड्या, ,ग्रीप तुटलेल्या, विद्युत तर लोंबकळलेल्या ,विद्युतपोल पडलेले, शेतकऱ्यांचा हंगाम,शेतकऱ्याने काय करायचे? अनेक प्रश्न तसेच या विभागातील संपुर्ण खेडे वर्धा, निर्गुडा, व पैनगंगा या नदीकाठावर असल्याने पूर परिस्थितीला तसेच अंधाराच्या साम्राज्याला तोंड द्यावे लागते त्यामुळे येथील गावकरी त्रस्त असल्याने विद्युत विभागविषयी असंतोष निर्माण झाला आहे.

श्री कटारे कार्यकारी अभियंता पांढरकडा यांच्याशी विजय पिदुरकर यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता ते म्हणाले  शिरपूर येथे 24 मे 2024 ला दुपारी दोन वाजता,श्री एकरे साहेब उपकार्यकारी अभियंता, संबंधित अभियंता, लाईनमन यांच्यासोबत बैठक घेऊन या बैठकीत सर्व गावातील घरगुती व कृषी पंप विद्युत समस्या समजून तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.तेव्हा  शिरपूर कार्यालय अंतर्गत येणाऱ्या 51 गावातील सर्व सरपंच ग्रामस्थ यांनी विद्युत बाबतच्या लेखी तक्रारी घेऊन 24 मे ला शिरपूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले. जर विद्युत विभागाने कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. संबधीत निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी यवतमाळ,आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार कार्यकारी अभियंता म रा वि म पांढरकवडा , उपविभागीय अभियंता म रा वि म वणी, पोलीस निरीक्षक वणी, सहायक अभियंता शिरपूर याना देण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, हेमंत गौरकार, मंजुभाऊ डंभारे, प्रदीप जेऊरकर, बंडू पिदुरकर, नागोराव बोरकुटे, प्रकाश पायघन, वसंता थोटे, महादेव दातारकर, रवींद्र पेचे, प्रकाश कोल्हे, दिनकर बोबडे, कैलास धांडे, सुनील आसुटकर, सतीश काळे, उमेश आसुटकर होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News