31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

वणीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्ताने ” भव्य रक्तदान शिबिर व समाजप्रबोधन मेळावा”

वणीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व समाजप्रबोधन मेळावा

सुरेंद्र इखारे वणी:- येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त  31 मे रोज शुक्रवारला खंडोबा – वाघोबा देवस्थान सभागृह येथे भव्य रक्तदान शिबिर  तर  1 जून 2024 रोज शनिवारला शेतकरी मंदिर येथे समाजप्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

        राजर्षी मल्हारराव होळकर यांचा राजकीय वारसा समर्थपणे चालविणाऱ्या तत्कालीन अनिष्ट रूढी प्रथांचे जोखड झुगारून देऊन लोकाभिमुख राज्यकारभार करून राष्ट्र निर्मानमध्ये आपले अमूल्य योगदान देणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा दैदिप्यमान इतिहास व सद्यस्थितीतील समाजापुढील प्रश्न याविषयी सखोल मार्गदर्शन या प्रबोधन मेळाव्यातून होणार असून त्याच बरोबर आज रक्तपेढीमध्ये रक्ताचा अपुरा साठा असल्याने रक्तदानाची आवश्यकता विचारात घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तेव्हा जास्तीत जास्त तरुण युवक मंडळींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

      31 मे ला होऊ घातलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया, अध्यक्षस्थानी पांडुरंग पंडिले तर प्रमुख पाहुणे डॉ जानराव ढोकने, माजी नगरसेवक नितीन चहानकर उपस्थित राहणार आहे. तसेच 1 जूनला होणाऱ्या समाजप्रबोधन मेळाव्याचे उद्घाटक पणन महासंघ महाराष्ट्राचे संचालक संजय खाडे, अध्यक्षस्थानी राजेंद्र कोरडे, तर प्रमुख मार्गदर्शक मा प्राचार्य डॉ प्रभाकर लोंढे सामाजिक विचारवंत नागपूर, प्रमुख अतिथी विजयबाबू चोरडिया, संभा वाघमारे, कैलास उराडे, प्रमुख उपस्थिती आशिष कुलसंगे, जय आबड, रमेश बच्चे, पुंडलिक मोहितकर, देविदास बोबडे, विलास शेरकी, संजय चामाटे, बबन वैद्य, रामचंद्र करडे, सौ सुनीता पचकटे, उपस्थित राहणार आहे.

तेव्हा या दोन दिवसीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र कोरडे, डॉ मधुकर आसकर, राम झिले, धनंजय उरकुडे, राजेश निरे, पांडुरंग पंडिले, संजय लव्हाळे, भाऊराव मत्ते, विकास चिडे, रघुनाथ कांडरकर, सुरेंद्र इखारे, संतोष सांबरे, काशिनाथ पचकटे, आशिष साबरे, राजीव बोबडे, संजय काळे, मंगेश चामाटे, महादेव मत्ते, भारत उरकुडे, सौ सुनीता पचकटे, सौ भाग्यश्री वैद्य, सौ कल्पना ढवळे व महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई समाज प्रबोधन मंच वणी ,मरेगावव झरी तालुका, खंडोबा वाघोबा देवस्थान, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय, राजमाता अहिल्याबाई होळकर महिलामंच यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News