31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

वणीत विमाशीच्या  सभेत नवनियुक्त प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख यांचा सत्कार

वणीत विमाशीच्या  सभेत नवनियुक्त प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख यांचा सत्कार

शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यां सोडविण्याचे आश्वासन

सुरेंद्र इखारे वणी :-  नुकतेच वणी येथील  विवेकानंद विद्यालयात  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वणी  तालुका कार्यकारिणीच्या वतीने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नवनियुक्त प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वणी तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व  विविध समस्यां  सभेत मांडल्या जसे जी पी एफ च्या पावत्या, एन पी एस रकमेचा घोळ, न मिळालेली वैद्यकीय थकीत देयके, जीपीएफ परतावा,ना परतावा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली , त्यानंतर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नवनियुक्त प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख सर यांनी समस्या विचारात घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले, याप्रसंगी विमाशी संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष गंगाधर गेडाम, जिल्हा संघटक, भूपेंद्र देरकर  उपस्थिती होते.  तालुका अध्यक्ष, किशोर बोढे, तालुका कार्यवाह,दत्तु महाकुलकर यांनी उपस्थितांकडून आलेल्या समस्यांची नोंद करून घेतली व वरिष्ठांना  समस्यांबाबत माहिती देऊन वणी तालुक्याच्या  समस्या निकालात काढाव्यात  असे सांगितले

यावेळी सभेला  विनोद मंगाम सर, दौलत घुग्घुल सर , सुभाष ताजने सर,प्रतिष लखमापुरे सर,लक्ष्मण ढेंगळे सर, नितीन सोमलकर सर, विकास बलकी सर, रविन्द्र गोखरे सर, अतुल गोंडे सर, वरपटकर सर व निब्रड बाबू व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी सदस्य शिकढक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनेउपस्थिती होती.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News