23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

*विवेकानंद विद्यालयाची यशाची उज्ज्वल परंपरा कायम*

विवेकानंद विद्यालयाची यशाची उज्ज्वल परंपरा कायम *

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदनाचा सर्वत्र वर्षाव
सुरेंद्र इखारे वणी — महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या
माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) चा निकाल आज दिनांक 27 मे 2024 रोज सोमवारला दुपारी 1.00वाजता  ऑनलाईन घोषित झाला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विवेकानंद विद्यालयाच्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली .  यामध्ये विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी कु.दिपाली मारोती कातरकर हिने 93.60 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली आहे. कु. कुमुदिनी हेमंत जोगी हिने 92.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु.सुहिनी संतोष दुपारे हिने 87.20
टक्के मिळवून शाळेतून तृतीय आली आहे. त्याचप्रमाणे कु.संस्कृती राजू आसुटकर हिने 85.00% मिळवून चोथा क्रमांक, तसेच  रोहन रामकिसन भट व युगांत नितीन पिंपळकर या दोघांनी 84.40% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहेत. या सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामकृष्ण मंडळाचे  सन्मानीय अध्यक्षा श्रीमती ताराबाई ठावरी, उपाध्यक्ष सन्मा.श्री.डॉ.शंकररावजी वऱ्हाटे, सन्मा.सचिव श्री.अविनाशभाऊ ठावरी,विद्यालयाचे सन्मा मुख्याध्यापक श्री.दिलीप आसकर  व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी  अभिनंदन केले.यावेळी
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय श्रीरामकृष्ण मंडळाचे सर्व पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मा.श्री दिलीप आसकर  व विद्यालयाचे सर्व शिक्षकांना दिले आहे.नेहमीप्रमाणे विद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News