22.9 C
New York
Thursday, July 4, 2024

जनता विद्यालय वणी ची यशाची परंपरा कायम*

*जनता विद्यालय वणी ची यशाची परंपरा कायम*
सुरेंद्र इखारे वणी :— महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या
माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) चा निकाल आज दिनांक 27 मे 2024 रोज सोमवारला दुपारी 1.00वाजता ऑनलाईन घोषित झाला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जनता विद्यालयाच्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली . यामध्ये जनता विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रुती पिसाराम वाढई हिने 93.80 % गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली आहे.व तिला संस्कृत या विषयात 100पैकी 100गुण आहे.भावेश सुनील उपरे ह्याने 92.20% गुण मिळवून द्वितीय तर साहिल दिलीप खिरटकर ह्याने 90.40% व जतीन रविकांत भोयर 90.40% गुण मिळवून शाळेतून तृतीय आला आहे. त्याचप्रमाणे कु. अष्टांगी चंदू परेकर हिने 90.00% मिळवून चौथा क्रमांक, तसेच कु.श्रावणी यादव महातळे व कु.श्रुष्टि भालचंद्र गालेवार या दोघांनी 89.20% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहेत. कु. आर्या महेश पठाडे 88.20 या सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर च्या सन्मानीय अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई अशोकराव जीवतोडे उपाध्यक्ष सन्मा.श्री. अंबरजी अशोकराव जिवतोडे , सचिव सन्मा.डॉ. अशोकराव जीवतोडे व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ एम.डी. जोगी उपमुख्याध्यापक श्री. डी. एस.बोबडे पर्यवेक्षक श्री. व्ही. एस आसुटकर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मिठाई भरवून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे सर्व शिक्षकांना व पालकांना दिले आहे.नेहमीप्रमाणे विद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवण्यात यश मिळविले आहे

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News