21.5 C
New York
Thursday, July 4, 2024

डी.ए.वी.स्कुल सुंदरनगर ला वर्ग ११ वी मध्ये प्रवेशाची संधी

डी.ए.वी.स्कुल सुंदरनगर ला वर्ग ११ वी मध्ये प्रवेशाची संधी
सुरेंद्र इखारे वणी :-भारत सरकार अनुदानीत डी.ए.व्ही.पब्लिक स्कुल (वेकोलि) निलजई,सुंदरनगर येथे या वर्षी पासुन वर्ग ११ करिता विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.
वणी परिसरात वेकोलि संचालित व अनुदानीत एकमेव नामांकित शैक्षणिक संस्था म्हणुन डि.ए.व्ही.पब्लिक स्कुल कार्यरत आहेत.फक्त वेकोलि कर्मचाऱ्यांच्या पाल्यांकरिता स्थापन झालेल्या या शाळेत आता वेकोलि व्यतिरीक्त ईतरही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.नर्सरी पासुन तर दहावी पर्यंतचे वर्ग या संस्थेत चालतात.उच्च प्रशिक्षित शिक्षक /अध्यापक वर्ग,अद्यावत ग्रंथालय व प्रयोगशाळा आणि विस्तीर्ण परिसर अशी या संस्थेची वैशिष्टये आहेत.अभ्यासक्रम सी.बि.एस.ई.पॅटर्न वर आधारीत असुन दर्जात्मक आणि वास्तव निकाल देण्याची या शाळेची परंपरा राहीली आहे.
या वर्षापासुन शैक्षणिक सत्र २०२४ -२०२५ करिता संस्थेत आता विज्ञान आणि कला शाखेकरिता प्रवेश प्रक्रिया २० मे पासुन सुरु झालेली आहे.विज्ञान शाखेकरिता इंग्रजी,हिन्दी/संस्कृत,भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,जिवशास्त्र,माहिती तंत्रज्ञान हे विषय उपलब्ध आहेत.तर कला शाखेकरिता इंग्रजी,हिन्दी/संस्कृत,अर्थशास्त्र,समाजशास्त्र,इतिहास, राज्यशास्त्र,माहिती तंत्रज्ञान आणि क्रिडा हे विषय राहणार आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सद्या प्रवेश देणे सुरू असुन सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात भेट देता येईल.अधिक माहिती करिता ८६९८९३२८८२,९९६०४९२८३७ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News