Wednesday, October 9, 2024
Google search engine
HomeUncategorizedवणी येथे मोफत योग शिबिर

वणी येथे मोफत योग शिबिर

वणी येथे मोफत योग शिबिर
सुरेंद्र इखारे वणी:-

भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली महिला योग समिती, वणी
यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत योग थेरपी, व विद्यार्थ्यांसाठी योग संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन दिनांक 1 व 2 जून ला श्री जैताई मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले.
आज पालक बालकांच्या विचित्र वागण्यामुळे त्रस्त आहे. त्यांना मुलाबाळांच्या भविष्याची चिंता सतावते आहे. महाराष्ट्र शासनाने दि. १४ मार्च २०२४ च्या परिपत्रकात योग, विज्ञान व मनोरंजनात्मक बाबींचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांमधील नैराश्य, उदासिनता, ताणतणाव हद्दपार करण्यासाठी “आनंददायी शनिवार” हा अभिनव उपक्रम शालेय स्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण योग शिबिर मध्ये मोबाईलचे व्यसन/पाकिटबंद अन्नाचे दुष्परिणाम, रोगप्रतिकारशक्ती, मनाची एकाग्रता, फुफ्फुस हृदय बळकटी, स्मरणशक्ती कशी वाढवावी? रागावर नियंत्रण ई. संबंधाने सखोल मार्गदर्शन महाराष्ट्रातील अग्रगण्य योग प्रशिक्षक सेवानिवृत्त इंजिनिअर संजय खोंडे (संघटन मंत्री तथा रिसर्च स्कॉलर) पतंजली योग समिती नागपूर हे येणार आहेत.

जेष्ठ नागरिकांच्या (महिला/पुरुष) वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक, मानसिक व भावनिक समस्या ई. वर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२४ ची आधिकृत थीम “महिला सक्षमीकरणासाठी योग” ह्या उद्देशाला अनुसरून दि. 1 जून ला महिलांना प्राधान्य दिले आहे. तरी विद्यार्थी, पालक, महिलांनी व जेष्ठ नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या योग शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दररोज सकाळी साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. महादेव खाडे, लक्ष्मण इहे, माया माटे, रमेश बोबडे, विजया दहेकर, लता थेरे, गुलाब निते, सुधाकर गारघाटे, दिगांबर गोहोकर, वसंत उपरे, राजकुमार पाचभाई, ममता श्रीवास्तव, जयप्रकाश राजूरकर, उषा चिकटे, सुषमा मोहितकर, स्वप्ना पावडे, ज्योत्स्ना खोकले, रजनी चवने, शारदा काकडे, नंदा काळे, संगिता चिकटे, डॉ. अरुण एकरे, विजय मत्ते, विजय ढाले, सुरेश बागळदे, व सर्व योगवर्गातील निमित योगसाधकानी केले आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments