21.5 C
New York
Thursday, July 4, 2024

मुख्याध्यापिका श्रीमती रेखा मडावी सेवानिवृत्त

मुख्याध्यापिका श्रीमती रेखा मडावी सेवानिवृत्त

सुरेंद्र इखारे वणी :-   विवेकानंद विद्यालय कायर येथील मुख्याध्यापिका श्रीमती रेखा कैलास मडावी ह्या 31 मे 2024 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले आहे. 

     सेवनिवृत्तीच्या निमित्ताने विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सहायक शिक्षक सुरेंद्र इखारे, रविकांत गोंडलावार, कु सोनाली भोयर व शिक्षकेत्तर कर्मचारी दिलीप कांदसवार हे होते यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रेखा मडावी याना सुदृढ आरोग्याच्या  व पुढील जीवन सुखमय जाओ अश्या शुभेच्छा   दिल्या.

      श्रीमती रेखा कैलास मडावी यांनी श्री रामकृष्ण शिक्षण संस्था संचालित विवेकानंद विद्यालय कायर येथे 1993 ते 2018 पर्यंत सहायक शिक्षिका पदावर कार्यरत होत्या त्यानंतर म्हणजे मार्च 2018 पासून मुख्याध्यापिका पदी पदोन्नती होऊन  आजपर्यंत म्हणजे 31 मे 2024 पर्यंत कार्यरत होते त्यांनी या संस्थेला  एकूण 31 वर्ष 8 महिन्याची सेवा  दिली.ही संस्था ग्रामीण आदिवासी बहुल भागातील असून त्यांनी एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळला.परंतु नियतवयोमानानुसार कर्मचाऱ्याला  सेवानिवृत्त व्हावे लागत असल्याने या पुढील कार्यभार हा संस्थेतील जेष्ठ  सहायक शिक्षक सुरेंद्र रामदास इखारे याना 31 मे 2024 रोजी दुपारी 11 .30 वाजता सोपविला . संस्थेच्या वतीने  शुभेच्छा देण्यात आल्या. 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News