22.8 C
New York
Tuesday, July 2, 2024

आदर्श हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.

आदर्श हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.
सुरेंद्र इखारे वणी    :- येथील आदर्श हायस्कूल चा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 68.66टक्के लागला असून अंकित केवट यांनी 81.40टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला तर जिनत शेख व टिना कुंडलकर यांनी 76.60व 73.60टक्के गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. या झोपडीत माझ्या या उक्तीप्रमाणे अंकित केवट अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द व चिकाटीच्या साहाय्याने त्यांनी बोर्डाच्या परीक्षेत 81.40टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला. या यशाबद्दल अंकित केवट, जिनत शेख व टिना कुंडलकर यांचा प्राचार्य आर एल मोहिते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अभ्यासात सातत्यता व दुर्दम्य इच्छाशक्ती हेच यशाचे रहस्य असल्याचे प्रतिपादन प्राचार्य आर एल मोहिते यांनी व्यक्त केले. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, प्राचार्य,गुरुवर्य यांना देतात. विकास बलकी, बाबराव कुचनकर, अजय बद खल, गणपत ठाकरे गजानन तेंभूर्डे, वैजनाथ खडसे, रविंद्र उलमाले, यशवंत भोयर, संध्या लोणारे, पुनम सिंह, शैलजा झाडे, मिना आत्राम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News