22.8 C
New York
Tuesday, July 2, 2024

धानोरकर कुटूंबियांकडून काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यास यश

धानोरकर कुटूंबियांकडून काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यास यश
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात प्रतिभाताईच्या विजयाचा जल्लोष

प्रमोद निकुरे यांचेकडून एक क्विंटल जिलेबीचे वाटप

सुरेंद्र इखारे वणी :- चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघ धानोरकर कुटुंबियापूर्वी भारतीय जनतापक्षाचा बालेकिल्ला झाला होता परंतु दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून मतदारसंघ बळकावला व काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यास यश मिळविले.
काँग्रेस पक्षाचे दिवंगत दमदार खासदार बाळूभाऊ यांच्या निधनाने मतदार संघावर संकट कोसळले 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत काँग्रेस पक्षामध्ये नेत्यानेत्यांत उमेदवारी बाबत रस्सीखेच दिसून येत होती शेवटी काँग्रेस पक्षाचे हायकमांड यांनी काँग्रेसचे दिवंगत खासदार यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभाताई धानोरकर याना देण्यात आली. काँग्रेसच्या या मतदार संघात आपशी भांडणामुळे भाजपच्या ताब्यात तर जाणार नाही अशा परिस्थितीत इंडिया गठबंधन पुढे आले व महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्व पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली व भाजपचा तगडा उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा 2लाख 60 हजारांनी दणदणीत पराभव करून प्रतिभाताईं धानोरकर यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवला.
बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनामुळे मतदारसंघात नैराश्य आले अशा परिस्थितीत बाळूभाऊंचे मतदारसंघातील मतदारांचे ,कार्यकर्त्यांचे, बेरोजगार तरुणाचे, शेतकऱ्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रतिभाताईंनी उमेदवारी मिळविली व त्या स्वतः कार्यकर्त्यांना घेऊन संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला अशा परिस्थिती मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने काम केले यासाठी सर्व महाविकास आघाडीच्या राजकीय पक्षाने कंबर कसली व मोठ्या मताधिक्याने प्रतिभाताईंच्या गळ्यात विजयाची माळ घातली व काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळविले. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाची लढाई ही काँग्रेस व भाजपा या दोनच राजकीय पक्षात चुरशीची लढाई होणार असल्याचे नागरिकांच्या चर्चेवरून दिसून येत होती. परंतु संपूर्ण देशात भाजप सरकार विषयी अनेक कारणांमुळे जनतेत नाराजगी दिसून येत होती त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागला. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे तगडे व दमदार उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा पराभव झाला. संपूर्ण मतदार संघात प्रतिभाताई धानोरकर यांच्या विजयाचा उत्साह प्रत्येक विधानसभा मतदार संघात साजरा होत असताना वणी विधानसभा क्षेत्रातील वणी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट मध्ये कांग्रेस पक्षाचे माजी शहर अध्यक्ष, तथा शिवाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद निकुरे यांनी एक क्विंटल जिलेबी वाटून प्रतिभाताई धानोरकर यांच्या विजयाचा उत्साह साजरा केला. मोठ्या संख्येने या उत्साहात ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांनी जिलेबीचा आस्वाद घेतला.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News