22.8 C
New York
Tuesday, July 2, 2024

*डॉ.निलीमा दवणे यांची रा.से.यो.यवतमाळ जिल्हा समन्वयक पदी निवड

*डॉ.निलीमा दवणे यांची रा.से.यो.यवतमाळ जिल्हा समन्वयक पदी निवड

उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने सन्मानित

सुरेंद्र इखारे वणी :-  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंर्तगत राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मा.डॉ.मिलींद बारहाते कुलगूरू यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच जिल्हा समन्वयक पदाकरीता मुलाखती पार पडल्यात तसेच रा.से.यो.मध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कार्यक्रम अधिकारी म्हणून यांची निवड पुरस्काराकरीता करण्यात आली.याचे परिपत्रक नुकतेच महाविद्यालयात प्राप्त झाले असून यात लोकमान्य टिळक महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा रा.से.यो.च्या कार्यक्रम अधिकारी डॉ.निलीमा दवणे यांची *रा.से.यो. यवतमाळ जिल्हा समन्वयक पदी निवड तर उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार* त्यांना घोषित करण्यात आला असून लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या दुहेरी मानाचा तुरा डॉ.निलीमा दवणेच्या माध्यमातून रोवल्या गेला आहे. डॉ.निलीमा दवणे गेल्या काही वर्षापासून रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहतात.त्या विद्यार्थी प्रिय असून अतिशय शिस्तप्रिय आहेत . त्यांनी विद्यापीठाच्या तसेच शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम विद्यार्थ्याच्या माध्यमातून राबविले असून वर्षभर समाज जागृती रँली,मतदान जनजागृती,एड्स जनजागृती,सायबर क्राईम,अन्नदान,बेटी पढावो बेटी बचाव,आपकालीन व्यवस्थापन,व्यक्तिमत्व विकास,मुलींच्या जन्माचे स्वागत करू या , स्वच्छता अभियान,झाडे लावा झाडे जगवा,जल बचाव अभियान, आत्म संरक्षणाच्या कार्यशाळा यासारखे अनेक अभिनव उपक्रम महाविद्यालयातून समाजापर्यत पोहचवले आहे.त्यांचा सन्मान पण विविध ठिकाणी झाला आहे.सोबतच विद्यापीठाच्या विविध शिबीरात विद्यार्थ्याना पाठवून प्रोत्साहन दिले आहे.याची पावती म्हणून रा.से.यो.स्वयंसेवक कु.मुस्कान सय्यद ला विद्यापीठाने पुरस्कार देवून गौरव केला.तर महाविद्यालयाचे रा.से.यो.स्वयंसेवक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शिबीरात सहभागी झाले आहे . डॉ.निलीमा दवणे यांनी सुद्धा जळगांव येथे झालेल्या राज्यस्तरीय *आव्हान* आपतकालीन व्यवस्थापन शिबीर सहभाग घेवून विद्यापीठाला प्रथम स्थान पटकविण्यात वाटा दिला आहे.त्यांनी विद्यापीठाच्या युवामहोत्सवात परीक्षक म्हणून कार्य केल असून दिल्ली नोयडा येथे झालेल्या राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यापीठ चमूचे व्यवस्थापक म्हणून कार्य केले असून *उत्कृष्ठ चमू व्यवस्थापक* म्हणून नुकताच मा.कुलगूरू डॉ.मिलीॆंद बारहाते यांनी त्यांचा गौरव केला.त्यांना * . या कार्याची दखल घेत विद्यापीठाने नुकतीच डॉ.निलीमा विजयराव दवणे यांची यवतमाळ जिल्हा समन्वयक पदी निवड केली आहे. तसेच यवतमाळ जिल्हा उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार देखील घोषित केला आहे.या यशाबद्दल संगाबाअमवि चे मा.कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते,प्रकुलगुरू डॉ.प्रसाद वाडेगांवकर,प्र- कुलसचिव श्री.मंगेश वरखेडे,रा.से.यो.विद्यापीठ समन्वयक डॉ.निलेश कडू , विद्यार्थी विकास संचालक डॉ.राजीव बोरकर,संस्थेचे अध्यक्ष मा . विजयजी मुक्केवार , उपाध्यक्ष मा. नरेंद्रजी बरडीया सचिव मां. सुभाषजी देशमुख सहसचिव मां. अशोकजी सोनटक्के तसेच सर्व संचालक गण यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे ,प्राध्यापक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News