22.8 C
New York
Tuesday, July 2, 2024

वैजनाथ खडसे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

वैजनाथ खडसे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.

सुरेंद्र इखारे वणी  :-  ग्रामीण भागातील प्रतिभावंत व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा त्यांना पुढील आयुष्यासाठी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या कडून व्यक्तिगत व समाजासाठी सर्वोत्तम कार्य घडावे आणि समाजाचा स्तर उंचावने या उद्दात्त हेतूने तिरळे कुणबी समाज संघटना द्वारा पुरस्कृत संत बाजीराव महाराज बहुउद्देशीय संस्था मुकुटबन तर्फे समाजातील प्रतिभावंत विद्यार्थी व प्रतिष्ठित बांधवांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. यात तिरळे कुणबी समाजात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ज्यांनी जीवन घडवले, कठोर परिश्रम व मेहनतीतून केलेली शैक्षणिक प्रगती व त्यातून घडवलेले सुंदर करिअर ज्यांनी या उज्वल यशाने स्वतःसह कुटुंबाचे, व समाजाचे नाव पंचक्रोशीत मोठे केले. याचा समाजबांधवांना सार्थ अभिमान असून त्यांच्या या उतुंग भरारीसाठी उज्वल यशासाठी आदर्श हायस्कूल वणी येथील, उपक्रमशील शिक्षक तथा ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांना तिरळे कुणबी समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याचे प्रमाणपत्र तसेच सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी शाखेचे अध्यक्ष गणेश बुटे, उपाध्यक्ष रमेश शिरपुरे, सचिव प्रा देविदास गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरासह समाज बांधवांची, उपस्थिती होती या पुरस्काराने समाज बांधव व सर्व स्तरातून वैजनाथ खडसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याबद्दल संस्थाध्यक्ष जयसिंगराव गोहोकर, सहसचिव महादेवराव वल्लपकर, प्राचार्य आर एल मोहिते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News