25 C
New York
Saturday, July 13, 2024

नगर परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात 10 वा  आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नगर परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात 10 वा  आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

पतंजली हरिद्वारच्या प्रेरणेतुन योग साधना

समाजसेवक विजयबाबू चोरडिया व माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचा पुढाकार 

सुरेंद्र इखारे वणी :- येथील नगर परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात 21 जून रोजी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

परम पूज्य स्वामीजी महाराज यांचे प्रेरणेने तसेच श्री. विजय बाबू चोरडीया सामाजिक कार्यकर्ता तथा धर्मदाता वणी व भा ज पा चे जिल्हाध्यक्ष तथा वणी न. प. चे माजी नगराध्यक्ष श्री. तारेंद्र बोर्डे यांचे विशेष पुढाकाराने  पावसाचे वातावरण असतांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. यावेळी योगशिक्षक संजयजी आस्कर, सहयोगशिक्षक उपमुख्याधिकारी जयंतजी सोनटक्के यांचे मार्गदर्शनात प्रोटोकॉल नुसार प्रथम सूक्ष्म व्यायाम, आसन, प्राणायाम घेण्यात आले. महिला सक्षमीकरण अंतर्गत मी अँड मॉम या थीम नुसार आई व मुलगी/आई व मुलगा यांचे कठीण आसनांचे प्रात्यक्षिक व सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मॉर्निंग ग्रुप वणी, विठ्ठल मंदिर वणी येथील योगसाधक तसेच वणी शहरातील ईतर वर्गातील सर्व योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे भा ज पा चे जिल्हाध्यक्ष तथा वणी न. प. चे माजी नगराध्यक्ष श्री. तारेंद्र बोर्डे हे जनतेमध्ये बसून योग करीत होते. श्री. किरणजी दिकुंडवार यांनी आभार प्रदर्शन केले.
उपस्थित सर्व योगसाधकांना नाश्त्याला मटकीची उसळ व फालाहार देण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मॉर्निंग ग्रुप वणी, विठ्ठल मंदिर वणी येथील योगसाधक तसेच श्री. सुरेश आवारी व त्यांची चमू यांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News