वणी येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपमात 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस थाटात संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार,भारत स्वाभीमान ट्रस्ट व पतंजली महिला योग समिती वणी यांचे वतीने दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन कल्याण मंडपम वणी येथे मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमासह संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांचे हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी श्री.दिनकरराव पावडे , प्रा.महादेव खाडे व ईतर योग शिक्षक व शिक्षिका हजर होते.आयुष मंत्रालय भारत सरकार च्या प्रोटोकाँलनुसार प्रार्थना, सुक्ष्मव्यायाम, विविध प्रकारची आसने, प्राणायाम,ध्यान,संकल्प व शांतीपाठ घेण्यात आला.
आजच्या योग दिवस कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे योगाचे महत्त्व स्पष्ट करणारे महिलांचे योगन्रुत्य हे होते.यावेळी हनुमान मंदिर सदाशिव नगर चिखलगाव येथील महिला पतंजली योग समिती वणी च्या अध्यक्षा सौ.मायाताई माटे व त्यांचे सहकारी योग शिक्षिका , धनोजे कुणबी समाज सभागृह चिखलगाव येथील योग शिक्षिका सौ.ममता श्रीवास्तव व त्यांच्या योगसाधक तसेच जगन्नाथ महाराज मंदिर वणी येथील योग शिक्षिका सौ.कुंदा सावसाकडे व ईतर योग साधक यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करणारे व विविध आसने समाविष्ट असलेले योग न्रुत्य सादर केले. सौ.शारदा काकडे व सौ.जया हिकरे यांनी भजन गायन केले.
या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तावीक प्रा.महादेव खाडे यांनी केले तर मंचावर योगा चे नमूना सादरीकरण लक्ष्मण इद्दे, रमेश बोबडे,मायाताई माटे व विजयाताई दहेकर यांनी केले तर योग साधकांमध्ये फिरून योग साधकांना मार्गदर्शन श्री.दिगंबर गोहोकार, श्री.वसंतराव उपरे व सौ.ममता श्रीवास्तव यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन सौ.स्वप्नाताई पावडे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री लक्ष्मण इद्दे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.रामराव गोहोकार,श्री.सुधाकरराव गारघाटे,श्री.गुलाब नितेश,श्री.राजकुमार पाचभाई,विजय ढाले,शारदा काकडे, रेखा बोबडे,संगीता चिकटे,उषा चिकटे, ज्योत्स्ना खोकले,सुषमा मोहितकर व योगसाधकांनी सहकार्य केले.
यावेळी वणी शहरातील अनेक योगसाधक व विद्यार्थी यांनी याचा लाभ घेतला.