22.8 C
New York
Tuesday, July 2, 2024

कायरच्या विवेकानंद विद्यालयात योगसाधना

कायरच्या विवेकानंद विद्यालयात योगसाधना

सुरेंद्र इखारे वणी :-   10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने कायर येथील विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी योगसाधना केली आहे.

      आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे निमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक सु रा इखारे यांनी योगाच्या विविध फायद्याविषयी जागरूकता निर्माण करून योग मानवी जीवनासाठी किती महत्वपूर्ण आहे असे मत व्यक्त केले. तसेच विद्यालयाचे शारीरिक शिक्षक तथा योग  शिक्षक स वि घुले यांनी योग दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारचे योगासने, प्राणायम, करून घेतली व त्यांनी योगविषयी मार्गदर्शन करीत असताना ते म्हणाले की योग ही एक प्राचीन प्रथा आहे जी भारतात उगम पावली आहे त्याकाळी ऋषीमुनीं योगाभ्यास करीत होते या योगसाधनेच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदा होतो व आरोग्य सुदृढ राहते असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार सहायक शिक्षिका सोनाली भोयर यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे, शारीरिक शिक्षक सतीश घुले, सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, सहायक शिक्षिका सोनाली भोयर तसेच प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडापे व शिक्षकेत्तर कर्मचारी दिलीप कानंदसवार, आकाश बोरूले उपस्थित होते. 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News