राजमाता अहिल्यामाई होळकर महिला मंचच्या अध्यक्षपदी प्रतिभा लोंढे ,उपाध्यक्षपदी विद्या येवले तर सचिवपदी आशा आस्कर यांची निवड
सुरेंद्र इखारे वणी – : येथील खंडोबा वाघोबा देवस्थान सभागृहात आज दिनांक 23 जून 2024 रोज रविवारला दुपारी 4.00 वाजता राजमाता अहिल्यामाई होळकर महिला मंचची नवीन कार्यकारणी गठीत करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राजमाता अहिल्यामाई होळकर महिला मंचच्या माजी अध्यक्षा सौ सुनीता पचकटे व सचिव कल्पना ढवळे यांचे उपस्थितीत नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली . या बैठकीत सर्वानुमते सौ. प्रतिभा लोंढे यांची अध्यक्षपदी , सौ. विद्या येवले यांची उपाध्यक्षपदी तर सचिवपदी सौ आशा आस्कर यांची सर्वानुमते ५वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे . याप्रसंगी मावळत्या अध्यक्षा सौ सुनीता पचकटे, सचिव सौ कल्पना ढवळे यांनी नवनियुक्त पदाधिकारी याचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या, या सभेला सौ. माया मत्ते, सौ सुनंदा पंडिले, सौ. सरीता शेरकी, सौ. विजया गवारकर, सौ. वनिता हुलके, सौ.विभा चिडे, सौ. संगीता इखारे, सौ. चैताली बुच्चे, सौ वंदना उरकुडे,सौ भाग्यश्री वैद्य या उपस्थित महिला सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .