23.3 C
New York
Sunday, June 30, 2024

ओबीसी विदयार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेतच

 

ओबीसी विदयार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेतच

ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार निखिल धूळधळ याना दिले 

ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन कार्यालयात मुक्काम आंदोलन  करण्याचा इशारा राजू पिंपळकर यांनी दिला

सुरेंद्र इखारे वणी  :– महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी राज्यातील ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यामध्ये 72 वस्तीगृहे सुरु करण्याचा निर्णय घेतला.सत्र 2023- 2024 मध्ये वस्तीगृह प्रवेशाचे विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले;परंतु वस्तीगृहात प्रवेश दिला नाही.अजूनही विदयार्थी वस्तीगृह प्रवेश्याच्या प्रतिक्षेत आहे.1 जुलै पासून महाविद्यालये सुरु होत आहे;परंतु अजूनही वस्तीगृह सुरू करण्यासाठी सरकार, प्रशासनाच्या हालचालींना वेग आलेला नाही;त्यामुळे अनेक विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करून शिक्षण घेत आहे. मागच्या सत्रात ज्या विदयार्थ्यांनी वस्तीगृह प्रवेशासाठी अर्ज भरले होते;त्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात त्वरित प्रवेश देण्यात यावा,सत्र 2024 – 2025 मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओबीसी वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करावी,
कनिष्ठ महाविद्यालयीन (वर्ग 11वी, 12वी )ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी विद्यार्थ्यांना ओबीसी वस्तीगृहात प्रवेश देण्यात यावा,कनिष्ठ महाविद्यालयीन (वर्ग 11वी, 12वी ) ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करावी,वस्तीगृह प्रवेशासाठी व आधार योजनेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राचे बंधन वगळण्यात यावे,
शासन निर्णय 16 मे 2012 नुसार एस.सी. विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात ओबीसी विद्यार्थ्यांचा कोटा 5% करण्यात आला आहे.तो रद्द करून पुर्ववत 20% करण्यात यावा,सन 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून उच्च शिक्षणात ओबीसी विद्यार्थीनींना 100% फी सवलत देण्यात येत आहे.तशीच सवलत ओबीसी विद्यार्थ्यांनाही लागू करावी. तसेच फ्री शिप सवलत साठी उत्पन्न मर्यादा रद्द करण्यात यावे, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2019-2020 या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात आली.ओबीसी विदयार्थ्यांना दरवर्षी 500 रुपये खर्च करून आवेदन पत्र सादर केले;परंतु सन 2019 ते 2024 या पाच वर्षात त्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली नाही.त्या सर्व विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी, मुलींच्या मोफत शिक्षणाचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा, महाज्योती मार्फत ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी विद्यार्थ्यांना NEET, IIT परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण व मोफत टॅबलेट योजना अर्ज प्रक्रिया त्वरित सुरु करावी,गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती देण्यात यावी. अशी मागणी आज गुरुवार, दि. 27 जून 2024 रोजी ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, मारेगाव, झरी च्या वतीने उपविभागीय अधिकारी,वणी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, यवतमाळ यांच्या कडे केली.मागण्या त्वरित पूर्ण केल्या नाही;तर इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात मुक्काम आंदोलन करू असा इशारा ओबीसी जनगणना समितीचे वतीने सहाय्यक संचालक ईतर मागास बहुजन कल्याण विभाग, यवतमाळ यांना निवेदनातून देण्यात आला.यावेळी ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष प्रदिप बोनगीरवार, निमंत्रक मोहन हरडे, निलिमा काळे, सविता रासेकर, शामरावजी घुमे, पांडुरंगजी पंडिले, प्रभाकरजी मोहितकर, सुरेश मांडवकर, रामजी महाकुलकर, सुभाष खुजे, गुलाबजी वांढरे, नामदेवराव जेणेकर, विलास देठे, पुंडलीकराव मोहितकर, विलास शेरकी, आसिफ शेख, भारत जेऊरकर, गणपत ठाकरे, ऍड. दिलीप परचाके, भैयाजी पिंपळकर, मनोज काळे, अशोकराव चौधरी, प्रदिप बोरकुटे, लक्ष्मणजी इद्दे, प्रशांत महाकुलकर, बबन ढवस, राजू पिंपळकर, धिरज भोयर, रवि क्षीरसागर, मनोज नवले, संजय गायकवाड, आणि सुरेश राजूरकर इत्यादी समाजबांधव उपस्थीत होते.

 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News