23.3 C
New York
Sunday, June 30, 2024

सामाजिक न्यायाचे तत्व समाजात रुजविण्याचे काम छत्रपती शाहु महाराजांनी केले.- डॉ. सिद्धार्थ गायकवाड

सामाजिक न्यायाचे तत्व समाजात रुजविण्याचे काम छत्रपती शाहु महाराजांनी केले.डॉ. सिद्धार्थ गायकवाड
नागपूर ( जयंत साठे ):-  हजारो वर्षापासून वंचित, शोषित, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजातील घटकाला न्याय देण्याचे काम शाहु महाराजांनी केले म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ म्हटले आहे. सामाजिक व्यवस्थेला बदलवून टाकण्याचे काम छत्रपती शाहु महाराजांनी केले. सामाजिक न्यायाचे तत्व खऱ्या अर्थाने समाजात रुजविण्याचे काम छत्रपती शाहु महाराजांनी केले असे डॉ.सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांनी आपले उद्घाटनीय भाषण करतांना म्हटले.
छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर मार्फत सामाजिक न्याय दिन व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंगेश वानखडे, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून आशा कवाडे, संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर, राजेंद्र भूजाडे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर होते.
पुढे आपल्या भाषणात बोलतांना त्यांनी छत्रपती शाहु महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिल. शाहु महाराजांनी त्यावेळी जातीय जण्नगणना केली. त्यानुसार त्यांना दिसून आले की. 98 टक्के उच्चवर्णिय लोक उच्च पदावर कार्यरत आहेत. तर केवळ दिड टक्केच लोक हे वंचित घटकाचे आहे. समाजातील शोषित वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे हे त्यांनी ओळखले त्यासाठी यांना शिक्षणाची आवश्यकता आहे, शिक्षणाने समाज सुधारेल म्हणून त्यांनी शाळा काढल्या शिक्षण सक्तीचे केले. विद्यार्थ्यांना राहण्याची भोजनाची सोय व्हावी यासाठी वसतिगृहे काढली. एवढेच नाही तर शिक्षण देणारे हे उच्चवर्णीयच होते ते शिक्षण द्यायला तयार नसल्यामुळे त्यांनी टीचर ट्रेनिंग स्कुल काढले व समाजाला शिक्षित केले. एवढेच नाही तर त्यांनी समाजातील शोषित वंचित घटकांना 50 टक्के आरक्षण मिळवून दिले. त्यांच्यासाठी व्यवसायाची सोय देखील मिळवून दिली. खऱ्या अर्थाने सामाजिक समात निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले, जात हे माणसामध्ये भेद निर्माण करते म्हणून जातविरहीत समाज निर्माण करण्यासाठी समता स्वातंत्र न्याय हे तत्व राबविले. आज हे सामाजिक न्यायाचे तत्वच समाजातील सर्व घटकांसाठी कार्य करीत आहे. यामूळेच माणसाला माणून म्हणून जगाना मानाचे स्थान मिळाले आहे.
सदर कार्यक्रमात पुढे स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या प्रतिनिधीक स्वरुपात पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थींना ओळखपत्र वाटप केले. शासकीय वसतिगृहात शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जे आज उच्च पदावर कार्यरत आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावी व बारावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा इंगळे, अरुण गाडे, आचल वर्मा, गौरव आळणे, सुरेश रेवतकर, हंसराज मेश्राम, योगेश वागदे, भूषण दळवे, कळंबे, नयना झाडे, प्रेमा लेकुरवाळे, मिश्रीकोटकर इ. उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या आयोजक सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर, संचालन शीतल गिते, आभार प्रदर्शन प्रफुल गोहते, यांनी केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News