23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

सिव्हिक्स सेन्स रुजविण्याची गरज  –  किशोर गज्जलवार गटविकास अधिकारी प स वणी 

सिव्हिक्स सेन्स रुजविण्याची गरज  –  किशोर गज्जलवार गटविकास अधिकारी प स वणी 

वणी तालुक्यातील मुख्याध्यापकांची सभा संपन्न

सुरेंद्र इखारे वणी:-    वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात होऊ घातलेल्या वणी तालुक्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, स्वयंअर्थसहित, व खासगी अनुदानित शाळांच्या मुख्यध्यपकांच्या सभेत  वणी पंचायत समितीचे गटविकासाधिकारी किशोर गज्जलवार मार्गदर्शन करताना म्हणाले की शाळा शाळांमध्ये स्पर्धा असावी या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करीत असताना त्यांच्यामध्ये सिविक्स सेन्स रुजविण्याची गरज आहे.यातून उत्तम नागरिक तयार होऊन देशाचा गौरव वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

          वणी पंचायत समिती शिक्षणविभागाद्वारे तालुक्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद ,स्वयंनार्थसाहित ,व खासगी अनुदानित शाळांच्या मुख्यध्यपकांची सभा लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. 

         या सभेचे अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य खांझोडे साहेब हे होते, प्रमुख अतिथी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गजलवार, नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी जी बी चवरे, गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर उपस्थित होते. याप्रसंगी तंत्रस्नेही शिक्षक कुरेकर सर, साधनव्यक्ती चिडे सर तसेच उपक्रमशील शिक्षक गजानन कासावार, दिलीप कोरपेनवार, व इतर काही शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. या सभेला तालुक्यातील 223 शाळांच्या मुख्यध्यपक व केंद्र प्रमुखांचा समावेश होता. तसेच आयोजक गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांनी मुख्याध्यापक याना मार्गदर्शन करीत असताना  यु-डायस प्रमोशन, शाळाबाह्य सर्वेक्षण

,  माझी शाळा सुंदर शाळा, शाळा मध्ये परसबाग तयार करणे. मादक पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यासाठी प्रहारी गट तयार करणे. शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे. महादीप साठी सुरुवातीपासूनच तयारी करणे. भारत टॅलेंट सर्च या परीक्षेसाठी विद्यार्थी बसविणे व तयारी करून घेणे याबाबत सविस्तर माहिती दिली. सभेचे सूत्रसंचालन व आभार विनोद नासरे सर यांनी मानले .सभेच्या यशस्वीतेसाठी वणी पंचायत समिती बिआरसीच्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News