22.8 C
New York
Tuesday, July 2, 2024

वणी तालुक्यात विजेच्या लपंडावाणे शेतकरी शेतमजूर परेशान

वणी तालुक्यात विजेच्या लपंडावाणे शेतकरी शेतमजूर परेशान
संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात ग्रामस्थांनी दिले विजवीतरण अधिकाऱ्यांना निवेदन

रात्री विजेच्या लपंडावाने दुर्घटना घडल्यास  महावितरण  जबाबदार राहील असा इशारा दिला

सुरेंद्र इखारे वणी – गेल्या काही दिवसांपासून  वणी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव  सुरु असल्याने शेतकरी शेतमजूर परेशान झाले आहे यावर्षीचा उन्हाळा रेकार्ड ब्रेक असल्याने ग्रामीण भागातील संपूर्ण  शेतकरी शेतमजूर ,वृद्ध, महिला व बालकांना या तीव्र उन्हाळ्याचा फटका केवळ वीज महावितरणच्या लपांडवामुळे  बसला आहे.

आता पावसाळा सुरु झाला असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साप, विंचू अशा सरपटणा-या प्राण्यांचा वावर असतो. रात्रीच्या वेळी हे प्राणी दिसत नसल्याने अनेकाना या प्राण्यांचा दंश होतो. प्रसंगी लोकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे मंदर येथील रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयात संजय खाडे यांच्या नेतृत्वात महावितरण अधिका-यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या समक्ष  निवेदन देऊन विद्युत वितरण सुरळीत करण्याची मागणी केली.

[ वणी तालुक्यात मंदरच नाही तर उकणी, भालर, लाठी  गावात देखील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याबाबत अधिका-यांशी चर्चा केली असता. त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र समस्या सुटली नाही. किंवा रात्री लाईट गेल्याने सर्पदंशासारखा अनुचित प्रकार घडल्यास ग्रामस्थांनी कार्यलयावर धडक दिल्यास घडणाऱ्या प्रकाराला महावितरण कार्यलय जबाबदार राहील असं इशारा  संजय खाडे व समस्त ग्रामस्थांनी दिला आहे]

यावेळी संजय खाडे यांचे नेतृत्वात  गणेश देवराव देऊळकर, किशोर बोढे, विजय परसुटकर, प्रतिक बुरडकर, गणेश निखार, अरविंद भट, प्रवीण उपे, संदीप गोपाळकर, संदीप निब्रड, बंडू उपरे, वैभव सोयाम, प्रवीण करडभुजे, आशिष बुच्चे, विजय बोढे, गुरुनाथ आडे, अल्ताफ शेख, अमोल चोपणे, संजय कापसे, महादेव बुचे यांच्यासह मंदर येथील रहिवासी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News