31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे डॉ. सचिन गाडे

गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे
डॉ. सचिन गाडे
सुरेंद्र इखारे वणी:-
एकविसावे शतक हे प्रचंड स्पर्धेचे शतक आहे. या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून त्या स्वप्नाचा पाठलाग करून स्वतःला घडवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे अशा गौरव पर कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवावे असे आवाहन वणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन गाडे यांनी केली आहे. ते नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ, प्रेस वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बक्षीस वितरक म्हणून बोलत होते.
नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधवराव सरपटवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून वाचनालयाचे सचिव गजानन कासावार व प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रवी बेलुरकर हे होते.
मागील 23 वर्षापासून सुरू असलेल्या या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभामध्ये यावर्षी वणी शहराजवळील गणेशपुर येथील रूपाली अनंतराव मोहितकर या तरुणीची राज्य स्पर्धा परीक्षेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्यांच्या आई-वडिलांचा याप्रसंगी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यासोबत नगरपरिषद शाळा क्रमांक सात मधील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादी झळकलेल्या वैष्णवी सुदामा बघेल या मुलींचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इयत्ता दहावी मध्ये वणी तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दहावीतील विद्यार्थी आरती दिलीप गोबाडे, सौरभ चंद्रकांत ठाकरे, तेजस्विनी राजू गव्हाणे, आर्या सचिन मते व इयत्ता बारावी मध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे शालू सुनील बंसल, काजल उमेशचंद्र कोचर, धनश्री अरुण गोहणे या विद्यार्थ्यांना आयोजक संस्था, अंजली व डॉ.बाळकृष्ण भागवत, मोहन व अनुश्री देशपांडे व जैताई मंदिर कडून रोख रक्कम, मेडल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यासोबत वणी शहरातील वणी पब्लिक स्कूल, आदर्श हायस्कूल, विवेकानंद हायस्कूल, जनता विद्यालय, लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल व नुसाबाई विद्यालय या प्रत्येक शाळेतील सर्वाधिक गुण घेणाऱ्या दहावीच्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यासोबत इयत्ता बारावी मध्ये एसपीएम कनिष्ठ महाविद्यालय, वणी पब्लिक कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय, लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल व नुसाबाई चोपणे कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष मनोगतात माधवराव सरपटवार यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांनी आपल्या समाजासाठी व देशासाठी आपल्या समोरील जीवन अर्पण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन कासावार यांनी केले. सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथरडकर यांनी केली. पाहुण्यांचा परिचय विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्राध्यापक अभिजीत अणे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन रवी बेलूरकर यांनी केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News