गोदावरी अर्बन वणी शाखेत डॉक्टर्स डे साजरा..
सुरेंद्र इखारे वणी :-
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसा लि नांदेड, कडुन संस्थेचे संस्थापक हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्रीताई पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, DGM सुरेखा दवे, AGM विजय शिरमेवार , रवी इंगळे आणि मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात शाखा वणीच्या वतीने जागतिक डॉक्टर्स डे चे औचित्य साधुन वणी ग्रामिण रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर डॉ भक्ती पंढरीनाथ काकडे यांचा सन्मान वणी शाखेत करण्यात आला.
दरम्यान प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन डॉ भक्ती यांना सन्मानित करण्यात आले. डॉ.भक्ती काकडे मॅडम यांचे आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
यावेळी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, तुषार ठाकरे, कनिष्ठ अधिकारी सौ प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, मंगेश करंडे, अमोल देऊळकर, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार उपस्थित होते.