रासेयो विभागाद्वारे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण
सुरेंद्र इखारे वणी :- स्थानिक कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले… याप्रसंगी प्राचार्य सर आपले मत व्यक्त करत असताने म्हणाले निसर्गाचा झालेला ऱ्हास व परिणामी वसुंधरेचा ढासाळलेला समतोल यामुळे बिघाडलेले निसर्गचक्र आता दुरुस्त करून या वसुंधरेला सुजलाम सुफलाम करणे हे या दिनाचे औचित साधून देशी वाणाचे वृक्ष लागवड करावे.. करिता महाविद्यालयात 30 बकुळ वृक्षाची लागवड करण्यात आली… या दिनानिमित्त महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते… सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली…