कायरच्या विवेकानंद विद्यालयात पर्यावरणाविषयी जनजागृती
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात इको क्लब फॉर मिशन लाईफ योजना या उपक्रमाअंतर्गत पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव तथा शारीरिक शिक्षक सतीश घुले ,सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, सोनाली भोयर उपस्थित होते याप्रसंगी मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्य आणि क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीकोनातून पर्यावरण जाणीव जागृती विकसित करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या उपक्रम कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर घोडमारे यांनी केले यामध्ये त्यांनी मिशन लाईफ अंतर्गत सात थीमवर उपक्रमांचे नियोजन केले यामध्ये जीवनशैली ,शाश्वत अन्नप्रणाली, इ कचरा, ऊर्जा बचत, पाणी बचत, प्लास्टिकचा वापर टाळणे, याबाबत सखोल माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखविले या उपक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत गोंडलावार यांनी केले तर आभार सोनाली भोयर यांनी मानले. उपक्रमाचे यशस्वीतेसाठी लिपिक सचिन टोंगे, प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडापे, शिपाई दिलीप कानंदस्वार व विद्यार्थी विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला.