कायर येथे स्वच्छ भारत मिशनंतर्गत ” आरोग्य समृद्धी प्रभात फेरी “
स्टॉप डायरिया अभियानातून जनजागृती
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात आज दिनांक 13 जुलै 2024 रोज शनिवारला सकाळी 8.30 वाजता गावातून बँड पथकाचे गजरात पताका घेऊन जाणीव जागृतीच्या घोषात स्वच्छ भारत मिशन द्वारे स्टॉप डायरिया अभियानांतर्गत ” आरोग्य समृद्धी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.
विवेकानंद विद्यालयातून निघालेल्या आरोग्य समृद्धी प्रभातफेरीचे रूपांतर शाळेच्या प्रांगणात जाणीव जागृती कार्यक्रमात झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव तथा शारीरिक शिक्षक सतीश घुले, आरोग्य समृद्धी अभियानाचे मार्गदर्शक मधुकर घोडमारे , रविकांत गोंडलावार उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य आजाराचे संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करून आजारावर प्रतिबंधक उपाययोजनेबाबत समयोचित मार्गदर्शन करून समृद्ध आरोग्यासाठी स्वच्छतेचि सवय लावणे गरजेचे आहे असे प्रतिपादित केले. तसेच उपस्थित अध्यापक मार्गदर्शक मधुकर घोडमारे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रविकांत गोंडलावार यांनी मानले त्यानंतर नियमित वर्ग घेण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील कर्मचारी मधुकर कोडापे, दिलीप कानंदस्वार, सचिन टोंगे, आकाश बोरूले यांनी पुढाकार घेतला.