लोकमान्य टिळक महाविद्यालयातील
थेट भरतीत २७ विद्यार्थी लाभान्वित
सुरेंद्र इखारे वणी :- लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय झरी जामनी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक महाविद्यालयात शुक्रवार दिनांक १२ जुलै २०२४ रोजी एक दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला नोकरी मेळावा बेकार्ट इंडस्ट्री प्रा.लि. पुणे कंपनीतर्फे केमीस्ट ट्रेनी या पदासाठी घेण्यात आला.बेकार्ट इंडस्ट्री प्रा.लि. तर्फे श्री. सुनील चव्हाण, श्री. विशाल केताह, अमोल बोतरे व अमोल देवनकर उपस्थित होते. या मेळाव्यात बी.एस्सी व एम.एस्सी रसायनशास्त्र, आयटीआय व अभियांत्रिकी डिप्लोमा च्या एकुण ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये लेखी व मौखिक चाचणी घेण्यात आली. त्यामधून २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. लोकमान्य टिळक महाविद्यालयातील उपस्थित असलेल्या १५ पैकी १५ विद्यार्थ्यांची निवड झाली हे विशेष उल्लेखनीय आहे.कारण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयभाऊ मुकेवार यांच्यासह सर्व संचालक मंडळींनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करीत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या उपक्रमाकरिता रसायनशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. सुनंदा आस्वले, डॉ. प्रशांत लिहितकर, प्रा. राहुल ठेंगणे यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे व राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय झरी जामनी चे प्राचार्य डॉ. ए. एन. कोरपेनवार यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेला रोजगार मिळाव्याचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजू आगलावे, श्री. जयंत व्यवहारे, श्री. कुशल झाडे व श्री. जयंत त्रिवेदी यांनी विशेष सहकार्य केले.