लोकमान्य टिळक महाविद्यालयात दीक्षारंभ संपन्न.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे उद्बोधन
सुरेंद्र इखारे वणी :- येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रवेशित नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सोयी सुविधा तसेच अध्ययनाच्या क्षेत्रात होत असलेले बदल नेमकेपणाने समजावेत यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरूपात, शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे सर्व विद्या शाखांमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या अध्यक्षतेखाली आरंभ झालेल्या या उपक्रमात प्राचार्य प्रसाद खानझोडे ( नवीन शैक्षणिक धोरण २०२० विद्यार्थी व शिक्षकांची भूमिका ), डॉ. गुलशन कुथे ( ओळख ग्रंथालयाची ), डॉ. अभिजित अणे ( विद्यार्थी विकास विभाग ) , प्रा. किसन घोगरे ( राष्ट्रीय छात्र सेना) , डॉ. नीलिमा दवणे ( राष्ट्रीय सेवा योजना) प्रा. महादेव भुजाडे ( करियर कट्टा), डॉ.गजानन अघळते ( विद्यार्थी जीवनात योगाचे महत्त्व ) , प्रा. उमेश व्यास (क्रीडा विभाग), प्रा. शैलेश जिट्टावार ( फंक्शनल इंग्लिश ) या मान्यवरांनी विविध चित्रफितींच्याद्वारे आपापल्या विषयाचे स्वरूप ,त्यात उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधा, याद्वारे मिळणारे लाभ , आजवर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी या विभागात मिळवलेल्या विशेष उपलब्धी, अशा विविध पैलूंच्या आधारे विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.
दीक्षारंभ कार्यक्रमाचे संयोजक डॉ.करमसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात डॉ. मनोज जंत्रे, डॉ. अजय राजूरकर यांनी विविध सत्रांच्या सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनाचे दायित्व सांभाळले. दिनकर उरकुंडे, संजय बिलोरिया, नितेश चामाटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.