कायर येथील विवेकानंद विद्यालयात आरोग्य तपासणी
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात आज दिनांक 15 जुलै 2024 रोज सोमवारला दुपारी 1.00 वाजता वणी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शासनाच्या वतीने ‘ राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आर बी एस के पथकातर्फे विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी डॉ मंजुषा दूगाने व डॉ वैरान भिलावेकर या मेडिकल ऑफिसर यांनी केली. यामध्ये किळकोर आजारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचार देण्यात आले. तसेच विशेष आजारी असणाऱ्या मुलांना वणी येथील ग्रामीण रुग्णालय वणी येथे संदर्भित करण्यात आले
विवेकानंद विद्यालयाती वर्ग 8 वा, वर्ग 9 वा व वर्ग 10 वीला वर्ग 8वि 03, वर्ग 9 वि ला 37 विद्यार्थी तर वर्ग 10 वीला 73 असे एकूण 113 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये विशेष संदर्भित एकूण 03 विद्यार्थी यामध्ये कर्णबधिर, तिरकपणा,वजन, उंची या विशेष बाबींवर उपचार करून संदर्भित करण्यात आले यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार , सोनाली भोयर व शिक्षकेत्तर कर्मचारी दिलीप कानंदस्वार, आकाश बोरूले यांनी आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकाला सहकार्य केले व विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणीला उस्फुर्त प्रतिसाद दिला..