एस पी एम विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- वणी पंचायत समिती शिक्षण विभागाचे अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान मेळावा दिनांक 16 जुलै 2024 रोज मंगळवारला एस पी एम विद्यालयात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विस्ताराधिकारी हेडावू साहेब हे होते प्रमुख अतिथी विस्ताराधिकारी प्रकाश नगराळे ,प्रमुख मार्गदर्शक परीक्षक प्रा. होमराज पटेलपैक सर लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी अभय पारखी सर राजर्षी शाहु विद्यालय, वणी हे होते. वणी तालुक्यातील शाळांना तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात सहभागी होण्याकरिता ,” कृत्रिम बुदधिमत्ता : संभाव्यता व आव्हाने”हा विषय देण्यात आला होता. यामध्ये वणी तालुक्यातील अल्प शाळांनी सहभाग नोंदवला आहे जवळपास 13 शाळांचा सहभाग होता. या विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक अनिकेत खिरटकर (वर्ग 9) लायन्स इंग्लिश मिडीयम स्कुल, वणी द्वितीय क्रमांक आरोही प्रमोद ढेंगळे ( वर्ग 9) एस पी एम विद्यालय, वणी यांचा आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक विनोद नासरे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वणी पंचायत समितीचे गटसाधन केंद्राचे शिक्षिका निशा वाटेकर, अलका काळे, जामलीवार , सहायक तंत्रस्नेही कुरेकर सर, यांनी पुढाकार घेतला