राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त “शिक्षण सप्ताह”
सुरेंद्र इखारे वणी – महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांचे पत्रानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करण्यात येत आहे.
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने देशात शिक्षण सप्ताह राबविण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हा शिक्षण सप्ताह प्रत्येक शाळेतून साजरा करण्यात येत आहे यामध्ये शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला आहे या उपक्रमात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. शिक्षण सप्ताहामध्ये शिक्षकांचा ,विद्यार्थ्यांचा, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा उपक्रम आहे. शिक्षण सप्ताहामध्ये खालील उपक्रमाची रूपरेषा 22 जुलैला अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, 23 जुलैला मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस, 24 जुलै क्रीडा दिवस, 25 जुलै सांस्कृतिक दिवस, 26 जुलै कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, 27 जुलै मिशन लाईफ, 28 जुलै समुदाय सहभाग दिवस या बाबतची माहिती शिक्षणाधिकारी डॉ जयश्री राऊत, उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे, उपशिक्षणाधिकारी गुंडे साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी अनिल शेंडगे, विस्ताराधिकारी स्मिता धावडे, गटशिक्षणाधिकारी वणी पंचायत समिती स्नेहदीप काटकर यांचे आदेशाने संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे सांगितले आहे.