सूरज अंदुरे यांचे सुयश
प्रदीप पुंगुरवार झरीजामनी – मुकुटबन येथील सूरज दिगंबर अंदुरे यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा एम एच सेट इतिहास या विषयातून उत्तीर्ण केली आहे. वणी विधानसभा सभा क्षेत्रातील अति दुर्गम भागातील झरीजामनी तालुक्यातील मुकुटबन येथील आहे. त्यांनी हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून एम ए इतिहास या विषयात त्यांनी अमरावती विद्यापीठातून परीक्षा उत्तीर्ण केली त्यांनी सेट ही परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली त्यामुळे त्यांचे परिसरात कौतुक ,अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एक चांगलं व्यक्तिमत्त्व व मनमिळाऊ स्वभाव म्हणून त्यांच्याकडे पहिल्या जात आहे.