वणीच्या स्वामी विवेकानंद अभ्यासगटला आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्याने स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट
वणी तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार
सुरेन्द्र इखारे वणी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ संलग्नित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकर गोविंदराव अडबाले यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त 14 वर्षांपूर्वी परिसरातील युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टिने अत्यल्प शुल्कात हक्काची जागा उपलब्ध व्हावी या संकल्पनेतून निर्माण झालेल्या स्वामी विवेकानंद अभ्यास गट वणीच्या अभ्यासिकेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ वणी यांचेकडून स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके भेट देण्यात आली.
दिनांक 10 ऑगस्ट2024 रोज शनिवारला दुपारी दोन वाजताचे सुमारास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत उपस्थित होऊन स्पर्धा परीक्षेची पुस्तके विद्यार्थ्यांच्या सुपूर्द केली यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका कार्यवाह दत्तू महाकुलकर यांनी केले तर प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष किशोर बोढे यांनी केले कार्यक्रमाचे आभार जिल्हा संघटक भूपेंद्र देरकर यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक दिलीप आसकर, संतोष बेलेकर सर, रमेश मून सर, दयालाल निकुंबे सर, गजानन टेंभुर्डे सर,वैजनाथ खडसे सर , घनश्याम पाटील सर , शैलेश नांदेकर सर, मोहन हरडे सर, रवी चांदणे सर, प्रवीण वैद्य सर, जयश्री राजूरकर मॅडम, वंदना शंभरकर मॅडम, राजश्री गोखरे मॅडम, सोनाली जेनेकर मॅडम व अभ्यास गटाच्या युवकांनी सहकार्य केले.