वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात करियर कट्टा
करियर कट्टा या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी संधीचं सोन करावं असे आवाहन
सुरेन्द्र इखारे वणी – येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात
दिनांक १० ऑगस्ट रोजी महाविद्यालयातील कला वाणिज्य आणि विज्ञान विभागातील भाग १ व २ च्या विद्यार्थ्यांसाठी करियर कट्टा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य माहित तंत्रज्ञान व सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेला करियर कट्टा या उपक्रमाचे लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजन करण्यात आले.
करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत I.A.S. आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, भारतीय संविधानाचे पारायण, वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, फाउंडेशन कोर्स-स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, सायबर सेक्युरिटी कोर्स-तांत्रिक शाखेतील टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी व ई-फायलिंग-कोर्स वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयुक्त ठरणार आहेत.
करियर कट्टा या उपक्रमांमध्ये रोजगाराभिमुख उद्योजकता विषयी व कौशल्य विकास संबंधी विविध कोर्सेस उपलब्ध होतील.
याप्रसंगी गिलानी महाविद्यालय, घाटंजी चे प्राचार्य डॉ. शहजाद यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मानसकुमार गुप्ता उपस्थित होते. तसेच , विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ अभिजित अणे व करियर कट्टा चे समन्वयक प्रा. महादेव भुजाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी श्री शितोळे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या अभ्यासाचं सिस्टीमॅटीक प्लॅनिंग करावं असं आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मानसकुमार गुप्ता यांनी केले. प्रा महादेव भुजाडे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रा.डॉ.अभिजित अणे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा उमेश व्यास यांचे विशेष सहकार्य लाभले.