Sunday, October 6, 2024
Google search engine
HomeUncategorizedवणीच्या शेतकरी मंदिरात "लोकशाही वाचविण्यासाठी संविधानाची गरज " या जाहीर व्याख्यानाचा लाभ...

वणीच्या शेतकरी मंदिरात “लोकशाही वाचविण्यासाठी संविधानाची गरज ” या जाहीर व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन 

वणीच्या शेतकरी मंदिरात “लोकशाही वाचविण्यासाठी संविधानाची गरज ” या जाहीर व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन 

वणी विधानसभेतील पुरोगामी – परिवर्तनवादी विचारसरणीच्या विविध पक्ष व संघटनांचे आयोजन

सुरेन्द्र इखारे वणी –    वणी विधानसभेतील पुरोगामी – परिवर्तनवादी विचारसरणी असलंएल्या विविध पक्षाव सामाजिक संघटनांच्या वतीने दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोज रविवारला दुपारी 3.00वाजता शेतकरी मंदिर येथे प्रख्यात सामाजिक व राजकीय अभ्यासक, विचारवंत तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांचे  जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

या जाहीर व्याख्यांचे अध्यक्षस्थानी .श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणीचे अध्यक्ष एडवोकेट देविदास काळे उपस्थित राहतील . या कार्यक्रमाचे विशेष अतिथी  ज्येष्ठ साहित्यिक दशरथ मडावी यवतमाळ ,माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.टिकाराम कोंगरे,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर,महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे संचालक संजय खाडे,वसंत जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी वणी चे अध्यक्ष आशिष खुळसंगे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वणी विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अनिल हेपट,मराठा सेवा संघ वणी चे अध्यक्ष अंबादास वागदरकर,माकपचे एडवोकेट कुमार मोहरमपुरी,शेतकरी संघटनेचे देवरावजी धांडे, आणि डॉक्टर असोसिएशन वणी चे अध्यक्ष डॉ.रमेश सपाट हे उपस्थिती राहणार आहे.

याप्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्याम मानव यांचे    ” लोकशाही वाचवण्यासाठी संविधानाची गरज ” या विषयावर जाहीर व्याख्यान  . गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक अंधश्रद्धा विरोधात  महाराष्ट्र ढवळून काढला होता.आता तर त्यांनी थेट राजकीय भूमिका घेतल्यामुळे या व्याख्यानाकडे अनेक लोक उत्सुकतेने बघत आहे.या व्याख्यानाच्या माध्यमातून राजकीय अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्य होऊ शकते,अशी अपेक्षा आयोजकांची आहे.म्हणून लोकशाहीवर विश्वास असलेल्या सुजाण नागरिकांनी या जाहीर व्याख्यानाचा लाभ घ्यावा.असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,शिवसेना उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,शेतकरी संघटना,विदर्भ जन आंदोलन समिती आणि सेवानिवृत्त समिती यांचे वतीने करण्यात आले आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments