लायन्स स्कूल येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
सुरेन्द्र इखारे वणी – येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात लायन्स क्लब वणी चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हस्ते, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष श्री संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शाळेचे उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, सचिव लायन सुधीर दामले, कोषाध्यक्ष लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक लायन महेंद्र श्रीवास्तव, क्लबचे सचिव लायन किशन चौधरी, लायन डॉ के आर लाल, लायन पुरुषोत्तम खोब्रागडे, शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समुह गाण व नृत्य सादर केले. मृण्मयी गोवारदिपे, स्मिरल डहाके, नैतिक ढुमणे, समृद्धी भोयर मिनल भोसकर या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्स्फूर्त भाषणे दिली तसेच फेब्रुवारी/मार्च २०२४ इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त व इयत्ता पाचवी व आठवी च्या शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी श्री राजाभाऊ पाथ्रडकर, श्री संजीव रेड्डी बोदकुरवार, श्री सुधीर दामले, श्री चंद्रकांत जोबनपुत्रा, व श्री महेन्द्र श्रीवास्तव यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले तसेच विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. यानंतर लायन्स क्लब च्या वतीने शाळेच्या आवारात लायन्स क्लबचे पदाधिकारी व अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्रास्ताविक सौ. चित्रा देशपांडे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन सौ. सोनाली काळे व सौ .मुग्धा खानझोडे यांनी तर सौ. मनीषा ठाकरे यांनी आभार मानले.